trupti desai and neha shitole 
मनोरंजन

तृप्ती देसाईंना प्रश्न विचारणाऱ्या नेहा शितोळेवर भडकले नेटकरी

'ज्यांना माझं म्हणणं पटलं नसेल..' नेहाचं टीकाकारांना रोखठोक उत्तर

स्वाती वेमूल

'ज्यांना माझं म्हणणं पटलं नसेल..' नेहाचं टीकाकारांना रोखठोक उत्तर

Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी ३'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात बिग बॉस मराठी २ची स्पर्धक नेहा शितोळेने Neha Shitole हजेरी लावली होती. नेहाने घरातील स्पर्धकांचं मनोरंजन केलं आणि त्याचसोबत काहींची शाळासुद्धा घेतली. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कच्या संचालक तृप्ती देसाई Trupti Desai होत्या. त्यांनी कॅप्टन्सी टास्क बरोबरीत सुटल्याचं जाहीर केलं. यावर नेहा शितोळेने त्यांना प्रश्न विचारला. बोर्डवर सुरेखा कुडची यांचं नाव असतानाही त्यांना कॅप्टन म्हणून जाहीर का केलं नाही, असा सवाल नेहाने तृप्ती यांना विचारला. यावर निर्णय योग्य घेतल्याचं उत्तर तृप्ती यांनी दिलं. मात्र नेहाने उपस्थित केलेला सवाल काही नेटकऱ्यांना आवडला नाही. पाहुणी म्हणून घरात गेली असताना तिने टास्कबद्दल चर्चा करू नये, असं मत नेटकऱ्यांनी नोंदवलं. नेहाने हिंदीत संवाद साधल्यानेही काहींनी तिच्यावर टीका केली.

काय म्हणाले नेटकरी?

'नेहा शितोळेसारख्या माजी स्पर्धकांना का घरात पाठवलं जातंय? ती मला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये का पसंत नव्हती, याची पुन्हा आठवण तिने करून दिली', असं एकाने लिहिलंय. तर नेहा शितोळे मार्गदर्शन करायला आल्या आहेत, ज्यांनी मागचा बिग बॉस मराठी गायत्री दातारसारखा खेळला होता. त्यांच्याकडून शून्य अपेक्षा,' अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे. हिंदीतील बोलण्यावरून टीका करताना एकाने लिहिलं, 'मराठी बिग बॉसमध्ये आला आहात, हे तुम्ही विसरलात का?'

नेटकऱ्यांना नेहा शितोळेचं उत्तर-

'आम्ही खूप गोष्टी बोललो आतमध्ये. सगळ्यांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. प्रेक्षकांच्या आणि आमच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गेलो होतो. वेळेअभावी अनेक गोष्टी दाखवता येत नाहीत. त्यामुळे आता आम्हाला Judge करण्यापेक्षा आपापल्या आवडत्या व्यक्तीला support करा आणि बिग बॉस बघत रहा', असं उत्तर नेहाने टीका करणाऱ्यांना दिलं.

आणखी एका पोस्टमध्ये तिने लिहिलं, 'सगळं सगळ्यांसाठी आहे. फक्त एक दोन स्पर्धकांसाठी मर्यादित नाही. सुरुवात जरी जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथशी बोलून केली असली तरी पुढचं बोलणं सगळ्याच स्पर्धकांना उद्देशून आहे. कृपया सर्व प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की टीव्हीवर दिसणारे सर्व कार्यक्रम एडिट होतात. त्यामुळे संदर्भ पुढे मागे होतात. तरीही ज्यांना माझं म्हणणं पटलं नसेल, I agree to disagree with you. ज्यांना पटत असेल त्यांना धन्यवाद!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT