मनोरंजन

"..तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल"; शिवलीलाने सुनावलं

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक शिवलीला ठरणार?

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठीच्या Bigg Boss Marathi 3 घरामध्ये नाव मोठे लक्षण खोटे या पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तसेच सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे आहे असे जाहीर केले. याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनल मध्ये भांडण झाले. आता जय, विकास आणि शिवलीला Shivleela Patil त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.

काय म्हणाली शिवलीला?

“ मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं.  पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले, तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल”, असं ती म्हणाली.

जय म्हणाला, “सोनाली मी तुझं नाव घेईन, तू खूप स्ट्राँग प्रतिस्पर्धी आहेस. तू मला खेळात मात देशील आणि मी म्हणून मी तुला घाबरतो. मी खरं बोलतो आहे. मी तुला प्रतिस्पर्धक म्हणून घाबरतो, असं मी तुला तोंडावर सांगतो." तर या प्रक्रियेत विकासने स्नेहाचं नावं घेतलं.

बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडेल हे आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल. हा शो दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT