Bigg Boss Marathi 4 Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: अक्षय-अपूर्वाचं यामूळे बिनसलं असं म्हणत राखी ओतणार आगीत तेल....

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसच्या घरात रोज नवे राडे होतं आहेत. त्यातच इतक्या दिवसात कधीही न पाहिलेली गोष्ट घडली. तब्बल 80 दिवसांनी अपूर्वा आणि अक्षयच्या मैत्रीत फुट पडली आहे. फिनालेचा टास्क पार पाडला त्यामध्ये अपूर्वा, अक्षय आणि किरण माने सुरक्षीत झाले आणि आरोह कॅप्टन झाल्यामुळं त्याला नॉमिनेट करता आलं नाही. तर प्रसाद जवादे,राखी आणि अमृता नॉमिनेट झाले आहे.

अपूर्वा आणि अक्षय मध्ये जोरदार भांडण होताना दिसलं. त्यातच राखी सावंत आणि अमृता धोंगडे ह्या दोघीही अपूर्वा आणि अक्षय बदल बोलतं आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून बिग बॉस मराठी ४ चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

राखी आणि अमृता पाळण्यावर बसल्या आहेत आणि अमृता बोलते जेव्हापासून अपूर्वा आणि अक्षय यांच्या घरचे आले तेव्हापासून त्यांच्या मैत्रित फुट पडली आता या दोघांमध्ये काहीही बोलणं होत नाही, आता तेरावा आठवडा आला तरी यांचा 'मी' पणा गेला‌ नाही आणि सिंगल घेत खेळण्याची अक्कल आता येत आहे, तर राखी बोलते इतके बोरिंग लोक कधी नाही बघितले आणि महेश‌ सरांनी देखील यांना 'मी' पणा सोडा सांगितले आहे तरी अजून i ,me , my self चालूच आहे.बाहेर घेऊन जा तुम्हचा i ,me , my self.


हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

खरं म्हणायला गेलं तर राखी सावंतने जेव्हा पासून वाईल्ड कार्ड एंट्री केलीय तेव्हा पासून घरात राडा करत आहे. 'मी'पणा करतच आहे मी काम नाही करणार... मी अशीच राहणार ....मला काही बोलायचं नाही अशा गोष्टी करते आणि आता तीच अक्षय आणि अपूर्वाच्या 'मी' पणावर चर्चा करत असल्यानं प्रेक्षकांनी तिला चांगलचं सूनावलं आहे.

त्यातच आता अक्षयच्या गादीवर कुणीतरी अंडे फोडले आहे. त्यामूळं तो खूपचं संतापला आहे. त्याला अपूर्वावर शंका आहे तर राखी तिलाहे काम कोणी केलंय त्याच नाव माहीत असल्याचं सांगितलं. त्यामूळं अंडे फोडणाऱ्या सदस्याचं नाव राखी सांगणार का? आणि ते समजल्यावर अक्षय काय करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT