Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and apurva nemlekar fights rokh thokh task sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: हो.. तुझी लायकी काढणार! अमृता धोंगडे अपूर्वावर भडकली..

कॅप्टनसी कार्यात धुमाकूळ, एकमेकांची लायकी काढल्याने वादाला सुरुवात..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असून आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र - मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच वाद होताना दिसत आहे. इथे कुणीही आपलं नसतं, या मांजरेकरांच्या वाक्याची प्रचिती येऊ लागली आहे. आज बिग बॉसने स्पर्धकांना 'रोख ठोक' ही कार्य दिले आहे. या कार्यादरम्यान स्पर्धक एकमेकांची अक्षरशः लायकी काढताना दिसणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and apurva nemlekar fights captaincy task)

बिग बॉस मराठी (bigg boss marathi)च्या घरामध्ये आज सुरु असलेल्या रोख ठोक या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपल्या मनातील सर्व गोष्टी ठामपणे आणि न घाबरता बोलून दाखवत आहेत कारण हा टास्कच मुळात त्यासाठी आहे. किरण माने यांनी तेजस्विनीला मारलेला टोमणा असो वा तेजस्विनीने समृद्धीला मारलेला टोमणा असो सगळेच सदस्य आपली बाजू मांडताना दिसत आहेत.

कॅप्टन्सीचे उमेदवार अपूर्वा आणि अमृता देखील आपली बाजू मांडताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अमृता देखील भर कोर्टात अपूर्वाला खडे बोल सुनावणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे, अपूर्वा जर आवाज चढवते तर दुसऱ्यांचे नीट ऐकते पण. अमृताचे म्हणणे आहे जी मुलगी एखाद्या सदस्याची लायकी काढते तर हिला मी कॅप्टन म्हणून का घेऊ ? अपूर्वा त्यावर म्हणाली, ह्याच्यावर दुनिया हसेल मला हे मान्य नाही. अमृता म्हणाली, मला ही योग्य वाटतंच नाही. हो मी तुझीलायकी काढणार...' त्यामुळे आता हा वाद अजूनच वाढताना दिसणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार ही आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : ऋतब्रता बॅनर्जी गटाला कोणतीही पुढील मुदतवाढ देण्यास विरोध

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT