Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and tejaswini lonari dispute  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: घरात फाटाफूट! अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा..

बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच होणार जीवलग मित्रांमध्ये ताटातूट..

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी'चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 20 दिवस उलटले असून आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र - मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच वादन होताना दिसत आहे. इथे कुणीही आपलं नसतं, या मांजरेकरांच्या वाक्याची प्रचिती येऊ लागली आहे.

गेले काही दिवस अमृता धोंगडे सतत वाद आणि भांडणात दिसत आहे. पण सध्या तिची जिवलग मैत्रीण तेजस्विनी मध्ये आणि तिच्यात वाद होताना दिसत आहे, मध्यंतरीही असे वाद झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला, प्रत्येक टास्कनुसार आपण नाती आणि ग्रुप बदलताना बघतो. अमृता धोंगडे आणि तेजूची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलायला येतात. आज यशश्री आणि तेजस्विनी मध्ये चर्चा होताना दिसणार आहे ज्यामध्ये ती तेजुला सल्ला देताना देणार आहे. यशश्रीचे म्हणणे आहे, मी प्रसादशी बोलत होते वरती कारण एकदा बोलून परत क्लिअर करणं गरजेचं आहे. जे काही शिफ्टिंग झालं आहे त्यामुळे एवढा फरक नाही पडणार... इकडचे दोन प्यादे जर तिकडे शिफ्ट झाले आहेत तसेच तिकडचे दोन प्यादे कुठेतरी जाऊ पाहत आहेत ते प्यादे इथे शिफ्ट होऊ शकतात.

पुढे ती म्हणते, ' मला तुमचे विचार ऐकायचे आहेत धो..च्या विषयी... कारण हा जो टास्क आहे ना तो उद्या संपेल आणि तुमचा एक बॉण्ड आहे, एक मैत्री आहे जी त्याच्या पलीकडची आहे. ती मैत्री तू मैत्री म्हणून ठेवणार आहे ? कि परत इथे ग्रुपिजम होणार आहे ?' त्यावर तेजस्विनी म्हणाली, 'मला तिच्यासोबत २ - ३ गोष्टी वैयक्तिक लेव्हलवर क्लिअर करायच्या आहेत. ते झालं तर ठीक नाही तर एक Housemate सारखं...' त्यावर यशश्रीचे म्हणते, 'ते तुझ्यावर आहे, पर्सनल equation पर्सनल ठेव, ग्रुपची लॉयलीटी आता ग्रुपकडे राहू देत...' यावरून कळते की अमृता आणि तेजूमध्ये सगळं ALL IS WELL नाहीय. पण त्यावरून काय वाद होतोय ते लवकर कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Gemini AI Saree Trend Alert: जेमिनी नॅनो बनाना AI साडीचा ट्रेंड फॉलो करताना व्हा अलर्ट, व्हिडिओ शेअर करत महिलेने समोर आणला धक्कादायक प्रकार

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ब्रेक अप के बाद! हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन अभिनेत्री; Jasmin Walia सह नातं संपलं? Mahieka Sharma ची आयुष्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT