kiran mane, apurva nemlekar, bigg boss marathi, ravrambha  SAKAL
मनोरंजन

Apura Nemalekar - Kiran Mane: बिग बॉस मधले दुश्मन आता एकाच सिनेमात दिसणार

ऐतिहासिक सिनेमात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर एकत्र दिसणार आहेत

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ४ दोन आठवड्यांपूर्वी संपलं. बिग बॉसच्या घरात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात भांडण झाली. पण जेव्हा शो शेवटाला आला तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्रीही बघितली. दोघांनी एकमेकांना कायम सपोर्ट केला. आता किरण माने - अपूर्वा नेमळेकर दोघे एकाच प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे अपूर्वा - किरणच्या फॅन्सना आनंद झालाय.

किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे दोघे 'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. अभिनेता अशोक समर्थ या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याच ऐतिहासिक सिनेमात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर एकत्र दिसणार आहेत. सकाळशी बोलताना अपूर्वाने तिच्या या सिनेमाचा खुलासा केलेला.

रावरंभा सिनेमात अपूर्वा पहिल्यांदाच मुस्लिम भूमिका साकारत आहे. याच सिनेमात सातारचा बच्चन अशी ओळख असलेले किरण माने सुद्धा झळकणार आहेत. किरण माने कोणत्या भूमिकेत सिनेमात दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या सिनेमाच्या निमिताने किरण - अपूर्वा पहिल्यांदाच सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी ४ नंतर किरण - अपूर्वाला एकत्र पाहायला त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठी ४ मध्ये किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांनी दमदार खेळ दाखवत टॉप ५ पर्यंत मजल मारली. अपूर्वा बिग बॉस मराठी ४ ची उपविजेता ठरली. तर किरण माने यांना टॉप ३ म्हणून समाधान मानावे लागले. बिग बॉस मुळे दोघांच्या फॅन फॉलोइंग मध्ये प्रचंड वाढ झाली. किरण माने यांची साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर दादरकरांच्या हृदयावर अपूर्वाने नाव कोरले

बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा आणि किरण दोघांचे सुरुवातीला एकमेकांशी वाद झाले. पण नंतर मात्र एकमेकांसोबत दोघे कायम उभे राहिले. बिग बॉस संपल्यावर सुद्धा दोघे मित्र म्हणून चांगले आहेत. आता रावरंभा निमित्ताने अपूर्वा - किरणची जोडी मोठ्या पडद्यावर कशी जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ७ एप्रिल २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहा महिने पालकमंत्री करा, सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो; नीलेश लंकेंचं विधान चर्चेत, कुणाला दिला इशारा?

Student Innovation Competition: कोपरगावच्या लेकीची अमेरिकेत भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक, जागतिक फिनालेमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उद्ध्वस्त; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात घेतले

Marathi News Live Updates : टोरेंट, पोशीर, शिलार, टाटा प्रकल्पांमुळे उध्वस्त होणारे पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतमध्ये ' 'कॅंडल मार्च'

१३ दिवसांनी राहू बदलणार रास; ३ राशींना नोकरी, व्यवसायात मिळणार मोठं यश!

SCROLL FOR NEXT