prasad jawade, bigg boss marathi 4, prasad jawade news, kavyanjali new serial
prasad jawade, bigg boss marathi 4, prasad jawade news, kavyanjali new serial  SAKAL
मनोरंजन

Prasad Jawade: बिग बॉस नंतर प्रसाद जवादेची नवी मालिका, चाहत्यांना दिलं खास सरप्राईज

Devendra Jadhav

Prasad Jawade New Serial News: बिग बॉस मराठी ४ नंतर प्रसाद जवादे चर्चेत आहे. प्रसाद आणि अमृता देशमुख रिलेशनशिपमध्ये आहेत अशीही चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठी मुळे प्रसादच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली.

आता प्रसादच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. प्रसाद बिग बॉस मराठी ४ नंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेत कमबॅक करतोय. प्रसाद कलर्समराठी वरील मालिकेत झळकणार आहे.

(bigg boss marathi 4 fame actor prasad jawade new marathi serial kavyanjali in colors marathi)

कलर्स मराठीवर काव्यांजली - सखी सावली हि नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे.

आता लवकरच मालिकेत एक नवी एन्ट्री होणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये ज्या सदस्याला प्रेक्षकांडून भरभरून प्रेम मिळाले असा आपल्या सगळ्यांचा आवडता प्रसाद जवादे मालिकेत झळकणार आहे.

प्रसाद या मालिकेत प्रीतमची भूमिका साकारणार आहे. आता नक्की हा प्रीतम कोण आहे ? याच्या येण्याने मालिकेत काय घडणार ? हे आपल्याला हळूहळू कळेलच.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, “बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही. खरंतर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही.

पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसा देऊ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली - सखी सावली या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली.

प्रसाद पुढे म्हणाला, "प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांसाठी एक छान रिटर्न गिफ्ट.

काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमा विषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं,

त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्‍या काळनुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे.

सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय." आता प्रसादला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यास त्याचे फॅन्स उत्सुक आहेत." काव्यांजली - सखी सावली सोम ते शनिवर रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वर पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT