bigg boss marathi 4 fame Amruta Dhongade visit jyotiba temple kolhapur sakal
मनोरंजन

Amruta Dhongade: चांगभलं! अमृता धोंगडे कोल्हापुरात ज्योतिबाच्या दर्शनाला..

बिग बॉस नंतर अभिनेत्री अमृता धोंगडे कोल्हापूर दौऱ्यावर..

नीलेश अडसूळ

Amruta Dhongade: बिग बॉस मराठी 4 च्या घरात एक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमृता धोंगडे. अमृता प्रचंड महत्वाकांक्षी आणि जिद्दी आहे, त्याचे दर्शन या खेळात घडलेच. शिवाय जिंकण्यासाठी तिने हर एक प्रकारे मेहनत घेतली. अगदी शेवटच्या टास्कला बाहेर पडणार म्हणून ती ओक्साबोक्शी रडली. पुढे ती टॉप पाच मध्ये आली पण विजेती होऊ शकली नाही. पण या खेळानंतर ती आता कोल्हापूर दौऱ्यावर गेली आहे.

(bigg boss marathi 4 fame Amruta Dhongade visit jyotiba temple kolhapur)

अमृता कामानिमित्त मुंबईत असली तरी ती मूळ कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिला गावाविषयी प्रचंड ओढ आहे. बिग बॉस च्या खेळातही ती अनेकदा कोल्हापूरविषयी भरभरून बोलली आहे. म्हणूनच का खेळ संपताच तिने आपलं गांव गाठलं आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सध्या अमृता कोल्हापूर दौऱ्यावर आहे. यावेळी तिने ज्योतीबाच्या नावानं चांगभलं म्हणत गडावर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओला तिनं कॅप्शन दिलं आहे की, 'Bigg Boss मधून बाहेर आल्यावर सगळ्यात आधी कोल्हापूर ला गेले घरी जंगी स्वागत झालं, कौतुक सोहळा झाला, आणि त्यानंतर थेट गेले ते ज्योतिबाला तुम्हा सर्वांच्या support मुळे आणि ज्योतिबा च्या आशीर्वादा मुळे Bigg Boss Marathi season 4 ची finalist झाले.. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं'' अशी पोस्ट तिने शेयर केली आहे.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून अमृता मनोरंजन विश्वात आली. इथवर पोहोचण्यासाठी तिने प्रचंड स्ट्रगल केला आहे. बिग बॉसचा चौथा सीजनही तिनं गाजवला. आता लवकरच ती नव्या मालिकेत झळकावी याची वाट चाहते पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT