Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या पर्वात कॅप्टन होणे अत्यंत मानाचे मानले जाते. त्यातही बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आजच्या भागात याचा उलगडा होणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. ‘बिग बॉस’च्या तीन हिट पर्वानंतर सर्वचजण चौथे पर्व कधी सुरू होणार याची वाट पाहत होते. अखेर रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पण पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडलेली दिसली. सध्या घरात प्रसाद जवादे, अपूर्वा नेमळेकर, अक्षय, मेघा, अमृता अशा काही स्पर्धकांनी कंबर कसल्याने एकदम अटीतटीचा सामना आहे. त्यामुळे कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
(bigg boss marathi 4 first captaincy task who is bigg boss marathi 4 first captain)
नुकत्याच झालेल्या भागात आपण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'चान्स पे डान्स' हे उपकार्य पाहिले. यामध्ये टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. पण कुणाकडून ही संधी काढून घ्यायची हे मात्र टीम B च्या हातात आहे. त्यामुळे आता टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्याचे उमेदवार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य बाद झाले. आज बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात पडणार पैशाचा पाऊस पडणार आहे, आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला पहिले कॅप्टन पद मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग विशेष रंजक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.