Bigg Boss Marathi 4: Kiran Mane Message To public...emotional note Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: पब्लिकच्या फोनवर फिरतोय सातारच्या बच्चनचा भावूक मेसेज..किरण माने म्हणाले,'जमेल तसं..'

बिग बॉस मराठीचा फिनाले येत्या ८ जानेवारीला आहे. यामुळे आता टॉप 5 मध्ये चुरशीची लढत पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

Bigg Bos Marathi 4: बिग बॉस मराठी 4 चं पर्व आता संपत आलं आहे. येत्या रविवारी 8 जानेवारी रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले पार पडतोय. शो ला त्यांचे टॉप 5 मिळाले आहेत- किरण माने, अपू्र्वा नेमळेकर, अक्षय केळकर,राखी सावंत,अमृता धोंगडे.

पण आता लगोलग कोण असतील टॉप ३ या चर्चेनंही सूर काढला आहे. अर्थात त्यावरनंही वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

त्यादरम्यानच आता व्हायरल होत आहे किरण माने यांचे एक लेटर...का बरं झालाय सातारचा हा बच्चन इतका भावूक? चला जाणून घेऊया.(Bigg Boss Marathi 4: Kiran Mane Message To public...emotional note)

आता बिग बॉसच्या घरातला प्रत्येक मिनिट जसा उरलेल्या फायनलिस्टसाठी महत्त्वाचा आहे तितकाच तो घराबाहेरच्या त्यांच्या चाहत्यांसाठी पोटात गोळा आणणारा आहे. अनेकदा अशा रिअॅलिटी शो मध्ये प्रेक्षकवर्ग इतका गुंग होऊन जातो की या शो मध्ये घडणारे वाद, रुसवे-फुगवे,प्रेमाच्या गोष्टी त्यांना आपल्या आयुष्याचा एक भाग वाटतात अन् नकळत ते त्यावर व्यक्त होतात. आता किरण मानेंनी टॉप ५ मध्ये पोहोचल्यावर पब्लिकच्या नावे मेसेज रुपानं लिहिलेलं ते लेटर म्हणूनच त्यांचे चाहते अधिक व्हायरल करताना दिसत आहेत .

किरण मानेंनी त्या लेटर वजा मेसेजमध्ये लिहिले आहे की, ''नमस्कार,

कलर्स मराठी वाहिनीवरील सध्या सुरू असणाऱ्या, बिग बॉस मराठी सिजन ४ मध्ये आपले लाडक्या सातारच्या बच्चनची म्हणजेच किरण माने यांची एंट्री टॉप फाईव्ह मध्ये झालेली आहे. किरण माने त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आणि आपण दिलेल्या भरभरुन मतांमुळेच इथवर पोहचले आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांचे आभार..!''

''पण आपल्या प्रेमाची खरी कसोटी आता लागणार आहे. टॉप फाईव्ह मध्ये पोहचलेल्या आपल्या किरण माने यांना जिंकण्यासाठी आपल्याला आता वोटिंगचा पाऊस पाडायचा आहे. तेव्हा फक्त आपल्या स्वतःचा फोन वरून नाही तर आपले मित्र - परिवार, संस्था, मंडळ, शाळा, कॉलेज अगदी जमेल तिथे, जमेल तसं भरपूर मतदान करायचं आहे. आपल्या या वाघाच्या निडर खेळीमुळे तो इथवर आला आहे. तेव्हा आता आपल्या प्रेमामुळे आणि आपण केलेल्या वोटिंग मुळेच तो ट्रॉफी पर्यंत पोहचू शकतो. तेव्हा लावा ताकद..! आन होवून जाऊ दे... जाळ आन धूर संगटचं..!''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT