Bigg Boss Marathi 4: Tejaswini Lonari wild card entry? promo viral Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4 Promo: तेजस्विनी जोमात..स्पर्धक कोमात.., लोणारीची वाईल्ड कार्ड एन्ट्री?

बिग बॉस मराठी 4 चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात तेजस्विनी लोणारीनं पुन्हा प्रवेश केलेला दिसत आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4 Promo: बिग बॉस मराठी ४ आता हळूहळू त्याच्या उत्तरार्धाकडे प्रवास करत आहे. घरात सात सदस्य उरले होते. ज्यातील दोन म्हणजे राखी सावंत आणि आरोह हे वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं घरात प्रवेश केलेेले सदस्य आहेत. सध्या राखीचाच धुमाकूळ घरात दिसत आहे. तर बाकी घरातील सदस्य थोडे थंड पडलेले दिसतायत. त्यामुळेच की काय आता बिग बॉस मराठीत पुन्हा एक वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा निर्णय घेतला गेलाय अशी चर्चा रंगलीय.(Bigg Boss Marathi 4: Tejaswini Lonari wild card entry? promo viral)

यासंबंधित नव्या प्रोमोला पाहून सोशल मीडियावर नेटकरी हैराण तर झालेयत पण खूश झाल्याचं चित्रही दिसत आहे. कारण त्या प्रोमोत स्पष्ट दिसत आहे की,हाताला दुखापत झाल्यानं घराच्या बाहेर जिला जायला लागलं त्या तेजस्विनी लोणारीची रीएन्ट्री घरात झाली आहे. तिला घरात पुन्हा पाहून सदस्य आम्हाला आनंद झालाय असं दाखवत असले तरी चिंताही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

आता तेजस्विनी वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून परत आलीय की घरात उरलेल्या सदस्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला आठवडाभर रहायला आलीय की आणखी काय कारण याचा अंदाज लागेनासा झालाय. पण हे मात्र नक्की की तेजस्विनी घरात आल्यानं घरातल्या स्पर्धकांना एक कडवी स्पर्धक परत आल्यानं टेन्शन असणार.

त्यात तेजस्विनीचं फॅन फॉलोइंग तगड झालंय अन् तिचे समर्थकही प्रेक्षकांमध्ये जास्त आहेत त्यामुळे संभाव्य विजेत्यांच्या फायनल लिस्टमध्ये तिलाही पाहिलं जाणार हे निश्चित. आजच्या भागात कदाचित यामागचं गुपित समोर येईलच की तेजस्विनी वाइल्ड कार्ड एन्ट्री आहे की नाही? तोपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT