Bigg Boss Marathi 4- Top 3 Contestant , public and Marathi industry prediction Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: हे आहेत Top 3! प्रेक्षकच नाही तर अख्ख्या मराठी इंडस्ट्रीनं घेतली 'या' तिघांची नावं

'बिग बॉस मराठी 4' चा फिनाले येत्या रविवारी ८ जानेवारी रोजी होणार आहे, पण त्याआधीच टॉप 3 आणि संभाव्य विजेत्याच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी सिझन 4' आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. शो ला त्याचे पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. कालच वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं घरात आलेला आरोह वेलणकर मिड वीक एव्हिक्शनच्या माध्यमातून बिग बॉसच्या घराबाहेर पडला.

आता बिग बॉसच्या घरात उरलेल्या पाच स्पर्धकांमध्ये शेवटच्या दोन दिवसात पहायला मिळेल कांटे की टक्कर. (Bigg Boss Marathi 4- Top 3 Contestant , public and Marathi industry prediction)

अपूर्वा नेमळेकर,किरण माने,अक्षय केळकर, राखी सावंत,अमृता धोंगडे हे टॉप 5 मध्ये पोहोचल्यानंतर आता घरच्यांचेच नाही तर घराच्या बाहेरच्यांचेही हृद्याचे ठोके जलदगतीनं धावू लागलेयत. आता चर्चा सुरू झालीय टॉप 3 ची. ईसकाळनं यासंदर्भात काही प्रेक्षकांशी आणि थेट मराठी मोनरंजन सृष्टीतील कलाकारांशी संवाद साधून त्यांचे अंदाज जाणून घेतले आहेत. यामधनं टॉप 3 साठी कोणत्या नावांना पसंती दिली गेलीय हे समोर आलं आहे.

प्रेक्षकांशी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांशी बोलून आम्हाला कळालेली टॉप 3 मधील नावं आहेत...अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने....आता प्रत्येकानं त्यांना यांच्यातलं काय आवडतं...हे टॉप 3 मध्ये का येतील किंवा का यावेसे वाटतात यामागचं कारणही सांगितलं आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

अक्षय केळकरनं खेळलेले टास्क लोकांना अधिक आवडलेयत..तर अपूर्वानं काही वेळी घेतलेले योग्य स्टॅंड..निर्णय अनेकांना आवडून घेतलेय..तिला वेळ ओळखून उत्तम वागता येतं असं अनेकांचे म्हणणे पडलेय तर किरण मानेंचा घरातील वावर,सातारकडची भाषा अन् त्यातनं गोडवा पसरवण्याची ट्रीक सारं उत्तम जमलंय असं मत काहींनी व्यक्त केलं. म्हणूनच हे तिघे टॉप 3 मध्ये येतील असं एकंदरीत ठाम मत लोकांचं आणि काही कलाकारांचं समोर आलेलं आहे.

आता प्रेक्षक आणि इंडस्ट्रीवाले यांच्या अंदाजाप्रमाणे अक्षय,अपूर्वा,किरण माने टॉप ३ मध्ये दिसू शकतात.पण तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही अंदाज वर्तवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT