Bigg Boss Marathi 4 winner last week rakhi sawant apurva nemlekar aroh velankar akshay kelkar sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: ...आणि बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महाविजेता आहे..

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू असून कार्यक्रम अत्यंत रंजक वळणावर आहे.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi grand finale : बिग बॉस मराठी म्हंटलं कि आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार ? सदस्य कोण असणार ? सिझनच घर कसं असेल ? आणि बरंच काही... आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला... १०० दिवसांपूर्वी १६ सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहे TOP ६ सदस्य.

यामध्ये महाराष्ट्राला मोठं सरप्राईझ मिळालं कारण, ज्या स्पर्धकाची वाट आपण सगळे बघत होतो त्या स्पर्धकाची एंट्री झाली आणि घरात त्या सदस्याने धुमाकूळ घातला. ती सदस्य म्हणजे राखी सावंत. सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले... कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला हि गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अश्या अनेक क्षणांचे साक्षिदार राहिले आहे. आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे.

कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही. बिग बॉस मराठी सिझन ४ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या TOP ६ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन ४ चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. बिग बॉस मराठी सिझन चौथाचा Grand Finale ८ जानेवारी रोजी संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजि तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंट ने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी... या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षिदार असतील.

आता एकदा शेवटचं या सदस्यांसोबत गप्पा मारूया आणि त्यांच्या या महत्वाच्या क्षणात त्यांच्याबरोबर राहूया. बिग बॉस मराठीच्या या पर्वाच्या प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम काही सदस्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा प्रवास संपला असून लवकरच पुन्हा एकदा नवे घर आणि नव्या सदस्यांसोबत नवे पर्व सुरू होईल असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT