Akshay Kelkar  Esakal
मनोरंजन

Akshay Kelkar: "तू मला जो काही त्रास दिलास.." अक्षय केळकरची धोंगडेसाठी खास पोस्ट चर्चेत

Vaishali Patil

Akshay Kelkar News:  छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलेला अभिनेता अक्षय केळकर हा नेहमीच त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. मराठी टीव्ही मालिकांमधून तो घराघरात पोहोचला.

सध्या तो ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान त्याच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ती खास पोस्ट अक्षयने अमृता धोंगडेसाठी केली आहे. जिच्यासोबत तो बिग बॉसमध्ये असतांना खुप भांडायचा.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात शेवटी टॉप पाच स्पर्धकांमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक उरले होते. त्यावेळी अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे यांच्यात चांगलीच भांडणं लागली झाली होती.

मात्र आता बऱ्याच दिवसानंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळाली. अमृता धोंगडेने नुकतीच ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी छान डान्स केला. अक्षय दोघांच्या डान्सचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करत अमृतासाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

तो या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितो की, "Bigg Boss house मध्ये पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या हाताला एक band बांधून आत पाठवलेलं. त्यात घरातल्या कामाचं division होतं. घरात आल्या नंतर थोड्या वेळाने माझ्या हातावरचा तो band पडला. आणि तू तो उचलून लपवलास. पुढे बराच वेळ तो शोधण्यात घालवावा लागला… !!!!

तर, असं आल्या आल्या पहिल्याच दिवसापासून तू जो काही मला त्रास देते आहेस… तो आज पर्यंत continue झालेला आहे! एकतर तू B टीम मधली! त्यामुळे आपण भांडणं हे by default होणारच होतं! पण task पलीकडे, B टीम च्या काही जणांसोबत घरात असल्यापासूनच माझी चांगली मैत्री झाली, आणि त्यात तू एक आहेस याचा मला आनंद आहे!

पण आज ची ही post खास Ticket to Finale task साठी आहे! त्या task मध्ये अपूर्वा माझी प्रतिस्पर्धी होती, आणि मला घरातील सदस्यांपैकी female partner माझ्यासाठी खेळायला निवडायचा होता. त्या वेळी घरात तू आणि राखी दोघीच होतात. राखीला stiches होते, त्यामुळे तिने खेळणं impossible होतं. आणि… It was your shark week!

पण, तुला विचारणं क्रमप्राप्त च होतं कारण तो task चा भाग होता आणि तुला त्रास होतोय paining होतंय हे माहीत होत! But here comes the Dhakkad Girl! तू लगेच हो म्हणालीस यार…. आणि त्या अवस्थेतही तू जे जीव तोडून खेळलीस माझ्यासाठी… माझ्यासाठी आपण तिथे जिंकलो होतो. Thank you so much dhongdeeeeee!!!!! आणि, thank you so much for being my amazing dance partner this season! बाकी मी शिकवलं तशीच नाचलीस! धन्यवाद! कळावे! लोभ असावा!"

त्याची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पोस्टला कमेंट केल्या आहेत. तर जिच्यासाठी ही खास पोस्ट केली आहे त्या अमृताने या पोस्टच्या कमेंटमध्ये कमाल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT