bigg boss marathi fame Mira Jagannath and Jai Dudhane new song video out Jiv Ranglay Go  sakal
मनोरंजन

Jiv Ranglay Go: बिग बॉस मधली 'ही' जोडी म्हणतेय 'जीव रंगलाय गो'.. जय दुधाने आणि मीरा जगन्नाथ एकत्र..

जय दुधाने आणि मीरा जगन्नाथ यांची रंगणार ऑन स्क्रीन केमिस्ट्री..

नीलेश अडसूळ

'इश्काचं तुफान उठलंय गो, दर्याला वादल सुटलंय गो' असं म्हणत मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे ही जोडी म्युझिक व्हिडिओमध्ये पुन्हा एकत्र एकत्र आली आहे. खास होळी पौर्णिमेनिमित्त सप्तसूर म्युझिकनं 'जीव रंगलाय गो' हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सादर केला असून, या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळत आहे.

सप्तसूर म्युझिकचे साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी 'जीव रंगलाय गो' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. अशोक काजळे, अर्चना कराले यांनी लिहिलेल्या या गीताला अशोक काजळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. सिद्धी तुरे आणि अशोक काजळे यांनी हे गाणं गायलं आहे.

कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाने आणि याच शोमधील स्पर्धक मीरा जगन्नाथ सप्तसूर म्युझिकच्याच 'जोडी दोघांची दिसते चिकनी' या म्युझिक व्हिडिओमध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते. त्या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. त्यानंतर आता 'जीव रंगलाय गो' या म्युझिक व्हिडिओत त्यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

होळी हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दशावतारातील पात्र शिमग्याची सोंग घेऊन फिरताना दिसतात त्यामुळे नयनरम्य कोकण, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीच्या पार्श्वभूमी 'जीव रंगलाय गो' हा म्युझिक व्हिडिओ साकारला आहे.

अतिशय श्रवणीय गीत, उत्तम छायाचित्रण, जय आणि मीरा यांची फ्रेश जोडी असलेला हा म्युझिक व्हिडिओ आहे.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात या जोडीने धुमाकूळ घातला होता. मीराने आपल्या शैलीने घर डोक्यावर घेतले तर जयने आपल्या हुशारीने या खेळात बाजी मारली. या खेळानंतरही दोघंचं बॉंडिंग अजून तसंच आहे. विशेष म्हणजे यांची पडद्या मागची मैत्री आता पडद्यावरही रंगताना दिसत आहे, आणि त्याला प्रेक्षकांचे प्रेम ही मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT