sai lokur wedding 
मनोरंजन

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूरने थाटामाटात बांधली तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला होता आणि आज अखेर सई विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली आहे. सईच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्याआधीचे प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सोशल मिडियावर शेअर करत होती. 

२ ऑक्टोबर २०२० रोजी सई आणि तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी सईने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत तिर्थदीपसाठी 'माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे' असं लिहिलं होतं. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी सई आणि तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं. याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि आज अखेर सोमवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा दिमाखदार विवाहसोहळा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने पार पडला. 

सई आणि तिर्थदीप यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर या दोघांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार पॉझिटीव्ह होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.

bigg boss marathi finalist sai lokur ties the knot with tirthadeep roy  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT