Bigg Boss Marathi  
मनोरंजन

'या' दिवशी पार पडणार बिग बॉस मराठी ३चा ग्रँड फिनाले

या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे.

स्वाती वेमूल

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी ३' Bigg Boss Marathi 3 सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या ७५ दिवसांपासून हा शो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. पहिल्या दोन सिझनपेक्षा यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय. आता या शोच्या ग्रँड फिनालेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि एक स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. या शोचे निर्माते सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी करत आहेत. या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे. Bigg Boss Marathi Grand Finale

पहिल्या दोन सिझनमध्ये पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये पाच नव्हे तर सहा स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास करणार असल्याचं कळतंय. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांमध्ये दोन स्पर्धक घरातून बाहेर पडतील आणि फिनालेसाठी टॉप ६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहतील. २७ डिसेंबरपासून बिग बॉस मराठी ३च्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेद्वारे अभिनेत्री भार्गवी चिरमुले छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

बिग बॉस मराठी ३चा ग्रँड फिनाले जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पार पडणार असल्याची माहिती सुरुवातीला होती. यंदाच्या सिझनला चांगला टीआरपी मिळत असल्याने हा शो आणखी काही दिवस वाढवणार असल्याचं म्हटलं जात होतं.मात्र ओमिक्रॉन व्हायरसच्या प्रसारामुळे निर्मात्यांनी एपिसोड्स न वाढवता डिसेंबरमध्येच ग्रँड फिनाले करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घरात विशाल निकम, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील यांच्यामध्ये चुरस रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT