Bigg Boss Marathi 4 
मनोरंजन

'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच?

या चौथ्या सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी बरेच सरप्राईज असतील.

स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या सिझनने २६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉसचा तिसरा सिझन चांगलाच गाजला. यातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा झाली. जवळपास १०० दिवसांच्या मनोरंजनानंतर आता बिग बॉस मराठीचा पुढचा सिझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे चौथा सिझन नवीन वर्षात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठी ४ हा एप्रिल २०२२ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या चौथ्या सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राईज असतील. शिवाय यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याबद्दलची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. (Bigg Boss Marathi 4)

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन हा जवळपास दोन वर्षांनंतर लाँच झाला होता. या सिझनला पहिल्या दोन सिझनपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाचा विचार करूनच आता चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. कोविड आणि लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनसाठी खूप प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र चौथ्या सिझनसाठी त्यांना फार थांबावं लागणार नाही, असं निर्माते ग्रँड फिनालेमध्ये म्हणाले होते.

सांगलीचा विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी ३'चा विजेता ठरला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला. या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे ठरला. कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा यंदाचा तिसरा सिझन जोरदार गाजला होता. घरातील जोरदार भांडणं, नवनवीन टास्कने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. या कार्यक्रमात १०० दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील १५ कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात आदिश वैद्य आणि निथा शेट्टी हे वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे सहभागी झाले होते. टॉप ५ स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्यामध्ये मोठी चुरस होती. यामध्ये विशाल निकमने बाजी मारली. अतिशय थाटामाटात हा महाअंतिम सोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्रावरून वाद! मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान, कोर्टात काय घडलं?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील पंक्चरचे गूढ उकलले; ‘खिळ्यां’चा व्हिडिओ व्हायरल

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे ३० सप्टेबरला उद्घाटन?; केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तयारी सुरू

VIDEO : अवघ्या 30 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! मुळशी तालुक्यात सिक्युरिटी गार्डचा Heart Attack ने दुर्दैवी मृत्यू; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Butterfly Bridge: ‘बटरफ्लाय’ पुलाचे खुणावतेय सौंदर्य; महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये उभारणी, रोषणाईचे आकर्षण

SCROLL FOR NEXT