bigg boss ott 2 fame Manisha Rani Hospitalised Due To Food Poisoning, Shares Health Update  SAKAL
मनोरंजन

Manisha Rani Hospitalised: 'बिग बॉस ओटीटी' फेम मनीषा राणी हॉस्पिटलमध्ये दाखल, हे आहे कारण

सर्वांच्या लाडक्या मनीषा राणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय

Devendra Jadhav

Manisha Rani Hospitalised News: बिग बॉस ओटीटी 2 फेम मनीषा राणी चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसनंतर मनीषा सध्या 'झलक दिखला जा 11' या डान्स रिॲलिटी शोमध्ये डान्स करताना दिसतेय.

पण आता मनीषा राणीच्या फॅन्ससाठी चिंताजनक बातमी समोर आलीय. मनीषाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मनीषा राणीची प्रकृती खालावली

मनीषा राणीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून मनीषाचा एक फोटोही समोर आला आहे. ज्यामध्ये ती खूप आजारी दिसत आहे. या फोटोमध्ये मनीषा हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून तिच्या हातात ड्रिप आहे.

मनीषाला अन्नातून विषबाधा झाल्याने तिला हॉस्पिटलमधून दाखल करण्यात आलंय. मनीषाचा हॉस्पिटलमधला फोटो व्हायरल झालाय.

मनीषाने तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत तिचे हेल्थ अपडेट शेअर करण्यासाठी एक व्हिडिओ सर्वांसाठी शेअर केलाय. मनीषा लिहीते, "मी आता ठीक आहे. मला फूड पॉयझनिंग झालं होतं. मला उलट्या, जुलाब आणि इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या. पण आता मी बरी आहे. काळजी करू नका. मला माहितीय तुम्ही माझ्यावर खुप प्रेम करता. लव्ह यू गाईज"

मनीषा राणी ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती बिग बॉस OTT 2 मध्येही दिसली होती. या शोमध्ये तिने तिच्या अनोख्या स्टाईलने सर्वांचं मनोरंजन केलं. या शोमध्ये ती टॉप 3 पर्यंत पोहोचली.

यानंतर ती बिग बॉस OTT 2 चा उपविजेता अभिषेक मल्हानसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. याशिवाय मनीषाने बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवसोबत एक म्युझिक व्हिडिओ देखील केला. जो खूप हिट झाला होता. सध्या मनीषा राणी झलक दिखला जा 11 मध्ये तिच्या नृत्याची जादू पसरवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT