Jad Hadid In Bigg Boss OTT 2 Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: बिग बॉस आहे की लस्ट स्टोरी? जैद हदीद अन् आकांक्षाच्या लिप किस अन् बरचं काही..

Vaishali Patil

Jad Hadid In Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन पहिल्या दिवसांपासून वादात आणि चर्चेत आहे. आता पर्यंत घराततील तीन एलिमेशन झाले आहेत.

ज्यात पुनित, पलक आणि आलिया यांना घरातुन बाहेर काढण्यात आलं आहे. यावेळचा बिग बॉस ओटीटी हा पुर्णपणे वेगळा करण्याचा प्रयत्न निर्माते करतांना दिसत आहे.

या शोमध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यातच आता बिग बॉस OTT 2 मध्ये किसिंग सीनही दाखवण्यात आला आहे.

दुबईचा मॉडेल जैद हदीदने हा 'बिग बॉस OTT 2' हा त्याच्या आकर्षक लूकमुळे सुरवातीपासूनच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या स्टोरीने देखील लोक भावुक झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तो लाईमलाईटमध्ये आहे.

त्यातच आता शोने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. शोच्या नवीन एपिसोडमध्ये जैद हदीद आणि आकांक्षा पुरी फ्रेंच एकमेकांना किस करताना दिसले. दोघांचा हा किसिंग सीन 30 सेकंदांचा आहे. ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

(Jad Hadid)

हदीदच्या देखण्या रुपानं आणि सभ्य वागण्याने त्याने सर्वांची मनं जिंकली मात्र आता प्रेक्षकांना त्याच वागणं खटकलं आहे. तो सुरवातीपासूनतच आकांक्षा पुरीसोबत खूप फ्लर्ट करताना दिसला.

काही दिवसांपुर्वीही त्याने आकांक्षाला अयोग्यरित्या त्याने स्पर्श केला होता. त्यावेळी सोशल मिडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.

(Akansha Puri)

यावेळी त्याने स्पष्टीकरण देताना सांगितले की त्याच्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्रांना शारीरिकरित्या स्पर्श करणे म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणे असं आहे. मात्र प्रेक्षकांना प्रेम आणि आदराच्या नावाखाली तो सर्वांशी जवळीक वाढवताना दिसत आहे.

आता एका नवीन एपिसोडमध्ये, अविनाश सचदेवने दिलेल्या एका टास्कसाठी दोघेही किस करतांना दिसले. त्यानंतर सायरस, अभिषेक, जाद आणि आकांशा बोलत आहेत आणि जादची चेष्टा करतांना दिसतात. यावेळी जैद म्हणतो की, "खर सांगू, मला तूला किस करायचे होते, तुझे ओठ इतके सुंदर आहेत."

याआधीही काही दिवसांपूर्वी जेव्हा या जैद हदीदने मनीषाला देखील फ्रेंच किससाठी विचारलं होतं.

यावेळी मनीषाने त्याला फ्रेंच किससाठी नकार देण्याऐवजी मनीषाने असेही सांगितले की, जर तिचे कुटुंबीय हा शो पाहत नसते आणि कॅमेरे नसते तर तिने त्याला फ्रेंच किस दिलं असतं. त्यानंतर आकांक्षा आणि जादचा किसिंग सीन घरता करण्यात आला.

(Bigg Boss OTT 2 Akanksha puri and jad hadid seen doing long french kiss Videp viral)

टास्कच्या नावाखाली नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर आकांक्षा आणि जैद यांनी केलेल किस नेटकऱ्यांना काही आवडलेले नाही.

सोशल मीडियावर प्रेक्षक संताप व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर एका यूजरने सांगितले की, जिओवरही लस्ट स्टोरी सुरु झाली आहे. तर काही थेट सलमानवरच निशाणा साधला आहे. सोशल मिडियावर जैद , आकांक्षा आणि मनिषाला नेटकरी ट्रोल करत आहे.

आता विकेंड का वारमध्ये सलमान काय बोलतो आणि कुणाचा क्लास घेणार याकडे प्रेक्षकांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT