Bigg Boss OTT 2 bigg boss ott 2 update after kissing akanksha puri jaid hadid said she is bad kisser pooja bhatt got furious over jad hadid  Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: 'तिला नीट किस करता आलं नाही', जैदनं तर कहरच केला! पुजानं झापलं

Vaishali Patil

'बिग बॉस ओटीटी सीझन 2' ची धमाकेदार सुरू आहे. आता या सीझनला सुरु होवुन दोन आठवडे पुर्ण होणार आहेत. या सिझनमध्ये सुरुवातीपासूनच अनेक वादविवाद सुरु आहेत. त्याचबरोबर अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या ड्रामा आणि संघर्षाच्या स्टोरीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर काहींच्या वागण्याने प्रेक्षक नाराज देखील आहेत.

त्याचबरोबर मागच्या एपिसोडमध्ये असं काही झालं की त्यामुळे शोच्या स्पर्धकांबरोबरच शोचा होस्ट सलमान खान यालाही ट्रोल करण्यात आलं.

बिग बॉसच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असं बोललं तरी काही वावगं ठरणार नाही. 'डेअर' गेमच्या टाक्स मध्ये त्यांना हा टाक्स देण्यात आला होता. दोघेही लाइव्ह शोमध्ये एकमेकांना बिनदिक्कत फ्रेंच किस करताना दिसले.

शोच्या सुरुवातीपासूनच आकांक्षा पुरी आणि जैद हदीद दोघेही अनेकदा फ्लर्ट करताना दिसले आहेत पण किसिंग सीननंतर तर त्यांनी तर कहरच केला. यानंतर सोशल मीडियावर लोक संतापले आहेत आणि त्याच्या व्हिडिओवर टीका करत आहेत

आकांक्षा पुरी आणि जैद हदीद यांचा किसिंग सीन चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. मात्र फक्त सोशल मिडियावरच नाही तर बिग बॉसच्या घरात देखील याच किसिंग सीनची चर्चा रंगली होती.

दरम्यान, जैद हदीदने आकांक्षासोबत आपला किसिंगचा अनुभव शेअर करतांना तिला 'बॅड किसर' म्हटले. त्यानंतर या प्रकरणावर अभिनेत्री पूजा भट्ट चांगलीच संतापली.

आकांक्षा पुरीला किस केल्यानंतर जैदने तिच्या किसिंग टॅलेंटवर शंका व्यक्त केली होती. त्याने शोचे बाकीचे स्पर्धक, फलक नाज आणि अविनाश सचदेव यांना सांगितले होते की, "आकांक्षा पुरी एक वाईट किसर आहे, मला किस करताना ती पूर्ण थरथरत होती आणि तिला मजा येत नव्हती". इतकंच नाही तर जैदने आकांक्षाला किस केल्यानंतर तिच्यातला इंट्रेस्ट कमी झाला आहे. आकांक्षा त्याला चुकीचे संकेत देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे ऐकल्यानंतर पूजा भट्टचा पाराच वाढला आणि तिने जैदवर जोरदार टिका केला. पूजा म्हणाली की, "तू खूप वाईट माणूस आहेस. पाहिल्यावर तर तु खूप एन्जॉय करत होतास असं वाटत होतं. यावर जैद म्हणाला की, ती थरथरत होती."

पूजा म्हणाली की, "जर तुम्ही एखाद्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी किस करत असाल तर साहजिकच ती घाबरेल.... तूझी कमेंट अजिबात चांगली नव्हती. नॉट कूल...नॉट कूल.. तू हे म्हणायला नको होतं."

त्यानंतर या विषयावर पूजा भट्ट आणि जैदमध्ये खूप वाद रंगला. पुजा त्याला म्हणते की, "मला वाटलं होतं की तू माणूस आहेस...कॉलेजला जाणारा मुलगा नाहीयेस..तू असं बॉय टॉक करायला नको होते."

तर दुसरीकडे आकांक्षाने किस केल्यामुळे ती खुप ट्रोलही झाली त्यानंतर आकांक्षा पुरीच्या टीमने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जैद हदीदसोबत किस केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

तो एका टास्कचा भाग होता असं त्यांनी सांगितले. त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर कदाचित आकांक्षाने असेच केले असते. ते तिचेस काम होते असंही टिमने सांगतिले. आता सलमान खान या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतो हे आजच्या विकेंड का वार मध्ये कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT