Bigg Boss OTT 2 jiya shankar Esakal
मनोरंजन

Bigg Boss Ott 2: एल्विशच घरात बिग 'बॉस'! वोटिंगचा रेकॉर्डच मोडला, तर सलमाननं जियाचा क्लास घेतला..

Vaishali Patil

Bigg Boss Ott 2: बिग बॉस गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. घरात वाईल्ड कार्ड एंट्रीने आलेल्या यूट्यूबर एल्विश यादव घरात येताच घराचा ताबा मिळवला आहे.

अविनाश सचदेव व्यतिरिक्त, तो बाकीच्या स्पर्धकांसोबत मस्ती करतांना दिसत आहे. मात्र घरात एका टिमला तो फारसा आवडत नाही ज्यात जिया आणि अविनाश, फलक यांचा समावेश आहे.

22 जुलैच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर होस्ट सलमान खानने वीकेंड का वारमध्ये जिया शंकरला जोरदार क्लास घेतला आहे. कारण तिने एल्विश यादवला साबणचे पाणी प्यायला दिले होते.

यावर सलमान तिला फटकारतांना बोलला की, एखाद्याला पाणी देणं हे पुण्याचं काम आहे आणि तू ते साबणामध्ये मिसळून त्याला दिले. याशिवाय सलमानने हँडवॉशची बाटलीत किती केमिकल आणि अॅसिड असतं. ते प्यायल्याने कोणाच्याही आरोग्याला हानी पोहोचू शकते, हे सगळ सांगतिलं.

जियानंतर सलमाननं मनीषा राणीचाही क्लास घेतला. तिला घरात फेक लव्ह गेम खेळू नको असा सल्लाही तिला दिला.

'बिग बॉस तक' आणि 'बिग बॉस खबरी' यांच्या पोर्टलनुसार, या आठवड्यात बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दोन स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत.

आशिका भाटिया, एल्विश यादव, जिया शंकर, जेडी हदीद, फलक नाझ आणि अविनाश सचदेव यांच्यासह 6 स्पर्धकांना या आठवड्यात नॉमिनेट आहेत.

जैद हदीद आणि फलक नाझ यांना घराबाहेर काढण्यात येणार असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.

'बिग बॉस ओटीटी 2' सध्या जिओ सिनेमावर सुरु आहे. शोच्या स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, अविनाश सचदेव, मनीषा राणी, जिया शंकर, जेडी हदीद, फलक नाज आणि बाबिका धुर्वे, आशिका भाटिया आणि एल्विश यादव हे स्पर्धक आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात शोचा विनर कोण हे सर्वांना कळेल.

तर बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त वोट एल्विश यादवला मिळाले आहेत. सोशल मिडियावर फक्त एल्विशचीच चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN Live: भारताची विजयी हॅटट्रिक! Super 4 मध्ये रविवारी IND vs PAK सामन्याची मेजवानी; जाणून घ्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक

IND vs OMN Live: हार्दिक पांड्याची मॅच विनिंग कॅच! अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ओमानच्या कलीमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

SCROLL FOR NEXT