Bigg Boss OTT 2 Grand Finale  Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Grand Finale: काही तासातच प्रतिक्षा संपणार! कुणाचं नशिब चमकणार? विजेत्याला काय मिळणार?

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Grand Finale: गेल्या 58 दिवसांपासून सुरू असलेला 'बिग बॉस ओटीटी 2' हा रिअॅलिटी शो अखेर काही तासातच संपणार आहे. या 'बिग बॉस ओटीटी 2' चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता होणार आहे.

फिनालेपूर्वीच बिग बॉस OTT 2 हा भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी स्ट्रीमिंग शो झाला आहे, या शो मध्ये प्रेक्षकांनी अनेक ड्रामा, वाद आणि तगडी स्पर्धा देखील दिसली.

आज 'बिग बॉस OTT 2' चा शेवटचा दिवस आहे. या सिझनमध्ये 13 स्पर्धक या शोचा भाग होते आणि नंतर वाइल्ड कार्ड एंट्री देखील करण्यात आली. आता घरात फक्त टॉप 5 स्पर्धक उरले आहेत.

आता एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट हे स्पर्धक बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता होण्याच्या शर्यतीत आहेत. आता सोशल मीडियाचा ट्रेंड पाहता फक्त एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान या दोघांमध्ये खरी स्पर्धा रंगणार असं दिसतयं.

आज या शोच्या फिनालेमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स आणि घरातील स्पर्धक थिरकताना दिसणार असल्याचं बोलले जात आहे. त्यातच आज जो स्पर्धक हा शो जिंकेल त्याच्यावर बक्षीसाचा भरपूर वर्षाव होणार असल्याचंही बोललं जात आहे.

महाअंतिम फेरी म्हणजेच फिनालेमध्ये विजेत्या स्पर्धकाला 25 लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. यासोबतच त्याला एक चमकदार ट्रॉफीही मिळणार आहे. हा पैसा स्पर्धकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मिळणारी ट्रॉफी देखील खुप मौल्यवान आहे.

निर्मात्यांनी अलीकडेच शोचा ट्रॉफी फोटो देखील शेअर केला होता. यासोबतच विजेत्याला आयुष्यभर मोफत फूड सेवाही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र बक्षीस रकमेबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्याचबरोबर 10 लाखांची सुटकेस देखील घरातील कोणता स्पर्धक घेऊन घराबाहेर पडतो हे देखील थोड्याच वेळात कळेल.

फिनालेमध्ये आता सर्व स्पर्धकांचा धमाकेदार डान्स देखील पहायला मिळणार आहे. पूजा भट्ट आणि बेबीका दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तर फिनालेमध्ये आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, टोनी कक्कर आणि असीस कौर देखील फिनालेमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT