BB OTT 2 Contestant List:  Esakal
मनोरंजन

BB OTT 2 Contestant List: नवाजुद्दीनची बायको ते शीझान खानची बहीण! हे स्पर्धक बिग बॉसमध्ये राडे करण्यासाठी तयार...

Vaishali Patil

टिव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. आता ओटीटीवरिल बिगबॉसचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला सीझन 2021 मध्ये प्रसारित झाला होता, जो करण जोहरने होस्ट केला होता.

मात्र आता या शोची वाढती लोकप्रियता पाहत शो च्या निर्मात्यांनी निर्णय घेतला आणि सलमान खान 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' होस्ट करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या शोच्या स्पर्धकांबद्दल अंदाज व्यक्त करण्यात येत होते त्यातच आता नुकताच 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चा प्रोमो रिलीज झाला.

त्यामुळे यावेळी बिगबॉसच्या घरात कोण कोण बंद होणार या बद्दलही माहिती खुलासा करण्यात आला आहे. त्यातच शेवटी निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' च्या स्पर्धकांची पुष्टी केलेली देखील यादी जारी केली आहे.

'BiggBoss_Tak' च्या ट्विटर हँडलद्वारे सर्व नावांची यादी शेअर केली गेली आहे. अविनाश सचदेव ते आकांक्षा पुरी, जिया शंकर, नवाजुद्दीनची पत्नी आलिया, पुनीत सुपरस्टार अशी अनेक नावं या यादीत आहेत.

त्यासोबतच आकांक्षा पुरी, जिया शंकर, नवाजुद्दीनची पत्नी आलिया, पुनित सुपरस्टार, बेबीका धुर्वे, फलक नाज, मनीषा राणी, अभिषेक मल्हान , पलक पुरस्वानी आणि श्रुती सिन्हा हे देखील या शोता भाग असतील असा दावा करण्यात येत आहे.

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया जी सध्या तिच्या मिस्ट्री मॅनमुळे चर्चेत आहे. ती देखील या सीझनच्या कन्फर्म केलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे.

'बिग बॉस ओटीटी'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीचे नावही पॉपअप होत आहे. आलिया देखील या शोचा एक भाग बनू शकते अशी बातमी आहे.

अंजली अरोरा, आवेज दरबार, जिया शंकर यांसारख्या स्टार्सची नावेही असल्याच्या अफवा आहे.

बिग बॉस OTT 17 जून 2023 पासून प्रीमियर होणार आहे. रोज रात्री ९ वाजता JioCinema वर पाहू शकता. OTT शोमध्येही जवळपास 14 स्पर्धकांची एंट्री असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan : यांचे खेळाडू चार दिवसांत निवृत्ती मागे घेतात, मग... ; पाकिस्तानच्या निर्णयाची सुनील गावस्करांनी उडवली खिल्ली

Green Salt : हिरवं मीठ म्हणजे काय? अचानक देशभर का होतंय ट्रेंड? पाहा घरच्या घरी कसं बनवायचं..

Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या पावलावर पाऊल! कराडात प्रीतिसंगमावर यशवंतरावांना केलं अभिवादन!

२००,००,००,०००! भारत-पाक सामना रद्द झाल्यास ICC ला बसणार मोठा फटका, पाकिस्तानकडून वसूल करणार ही रक्कम?

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

SCROLL FOR NEXT