Bigg Boss OTT Season 2 Grand Finale Winner Latest Updates elvish yadav Is Winner of this Season  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav: जे जनतेच्या मनात तेच बिस बॉसच्या घरात! एल्विश यादव ठरला महाविजेता....

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Winner: काही दिवसांपुर्वी ओटीटी 'बिग बॉस' चा दुसरा सिझन सुरु झाला. या सिझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. पहिला सिझन सलमान खाने होस्ट केला नव्हता त्यांमुळे त्या शोला इतकी लोकप्रियता मिळाली नव्हती मात्र या सिझनने लोकप्रियतेचा रेकॉर्ड मोडला.

अखेर 58 दिवसांपासून सुरू असलेला 'बिग बॉस ओटीटी 2' हा रिअॅलिटी शो अखेर संपुष्टात आला आहे. या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता संपली आहे. शोच्या या सीझनच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे.

(Bigg Boss OTT 2 Grand Finale)

'बिग बॉस ओटीटी 2' स्पर्धेचा विजेता सर्वांचा आवडता आणि लाडका स्पर्धक एल्विश यादव ठरला आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीनं घरात आलेल्या एल्विशनं काही दिवसातच घराचा ताबा घेतला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला होता. तो विनर होण्याआधीच सोशल मीडियावर विनर म्हणुन त्याचे नाव ट्रेंड होत होते.

एल्विशला टक्कर देण्यासाठी घरात अभिषेक मल्हान आणि पुजा भट्ट यांच्यात टक्कर झाली होती. अभिषेकच्या चाहत्यांनी देखील त्याला जिंकवण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले मात्र एल्विश आर्मीनं त्यांनी मात देत त्याच्या एल्विशला बिग बॉसचा बॉस केला.

(Bigg Boss OTT Season 2 Grand Finale Winner Latest Updates)

दिमाखदार फिनालेमध्ये अखेर ती वेळ आली आणि सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. टाळ्या आणि शिट्या आणि फटाक्यांच्या आवाजात हिऱ्यांची चमकणारी ट्रॉफी सलमान खानने एल्विश यादवला दिली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर फक्त एल्विशच्याच नावाची हवा आहे.

बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता ठरलेल्या एल्विशला 25 लाख रुपये आणि बीबी ओटीटीची चमकणारी ट्रॉफीही मिळाली.

बिग बॉसच्या एतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड एंट्रीने आलेल्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं. 17 जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये 13 स्पर्धक दिसल होते त्यानंतर 4 आठवड्यात घरात वाइल्डकार्ड एंट्री झाली. त्यात घरात आला होता एल्विश यादव. घरात येताच त्याने सगळ्या घराचं वातावरण बदललं. हे केवळ त्याचे चाहतेच नाही तर घरातील स्पर्धक आणि सलमान खान देखील म्हणाला होता. (Bigg Boss OTT 2 Finale Voting Live Results)

26 वर्षांच्या एल्विशची खुप तगडी फॅन फोलविंग आहे आणि याचाच फायदा आज त्याला झाला. त्याने घरातील सदस्यांचे आणि प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. जेव्हाही त्याने काही चुक केली तेव्हा त्याने माफी देखील मागितली. त्याच्या याच वागण्याने चाहत्यांच्या मनात एल्विशने वेगळीच जागा निर्माण केली होती. त्यांमुळे आता त्याच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरुन मत दिली आणि बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता बनवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT