Pooja bhatt Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT Season 2: आणखी एक धक्का! फलक अन् जैद पाठोपाठ 'ही' स्पर्धकही बिग बॉसच्या घरातुन बाहेर!

Vaishali Patil

बिग बॉस ओटीटी सध्या रंगात आलं आहे. या आठवड्यात घरातुन अचानक दोन स्पर्धक बाहेर पडले. Bigg Boss Ott 2 डबल Eviction झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. फलक नाझ आणि जैद हदीद यांना रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आलं.

आता मात्र बिग बॉसच्या घरातुन आणखी एक माहिती समोर आली आहे . यामुळे चाहत्यांची निराशा होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' मधील सभ्य आणि मजबूत स्पर्धक म्हणुन अभिनेत्री पुजा भट्टकडे पाहिलं जात होतं.

ती घरात मॉनिटर बनत असते असंही अनेकदा तिला बोललं जातं मात्र ती तिचा खेळ खुप लक्षपुर्वक खेळत असते. तिचे आत्तापर्यंत घरात खुप कमी लोकांसोबत मतभेद झाले आहेत. ज्यांच्यासोबतही झालं आहे तिने नंतर त्यांच्याशी मैत्री केली आहे. आता पूजा भट्ट घराबाहेर जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

पूजाला घरातुन बाहेर का काढण्यात आले याचे कारणही समोर आले आहे. फलक नाझनंतर लगेचच पूजा भट्ट बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्याने प्रेक्षक खुप निराश झाले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, पूजा भट्टने हा शो मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या वैद्यकीय कारणांमुळे हा शो सोडल्याच्या बातम्या आहेत.

त्यामुळे जी पुजा फिनालेपर्यंत पोहचेल असा विश्वास लोकांना होता ती आता घरातुन जाणार आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे ती पुन्हा फिनाले होण्याच्या आधी शोमध्ये परतेल असा दावा केला जात आहे.

पूजा घराबाहेर पडल्याने अभिनेत्री बेबिका धुर्वेलाही खुप मोठा धक्का बसला. या मागचं कारण म्हणजे बेबिकाने काही गोंधळ केला तर पूजा तिला सांभळत होती.

पूजा मनीषा राणी, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, फलक नाझ आणि अविनाश सचदेव यांचीही पुजा खुप चांगली मैत्रिण होती.

पूजा भट्ट घरात राहण्यासाठी एका एपिसोडसाठी जवळपास 45 हजार रुपये मानधन घेत होती .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT