Rubina Dilaik  
मनोरंजन

Rubina Dilaik injured: चित्रिकरणाच्या वेळी अपघात, चाहते काळजीत

बिग बॉसची 14 ची विजेती रुबीना दिलैक ही सध्या चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: बिग बॉसची 14 ची विजेती रुबीना दिलैक ही सध्या चर्चेत आली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्घ असणारी अभिनेत्री (Bigg Boss 14) रुबीनाचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमी (social media news) चर्चेत असणाऱ्या रुबीनानं तिच्या इंस्टावरुन फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. तो फोटो (Rubina Dilaik) पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रुबीनानं तो फोटो शेयर करुन त्याला एक कॅप्शन दिली आहे. त्यातून तिनं आपल्याला झालेल्या दुखापतेविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. तिला तिच्या एका मालिकेच्या चित्रिकरणाच्या वेळी अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या रुबीनानं चित्रिकरण थांबवलं आहे. डॉक्टरांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे.

रुबीनानं आपल्याला दुखापत कशी झाली हे सांगितलं नसलं तरी, चाहत्यांनी तिला कदाचित मालिकेच्या चित्रिकरणाच्या वेळी दुखापत झाल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे. तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. आता त्या फोटोंना नेटकऱ्यांनी कमेंट देत रुबिनाला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे. तिच्या पाठीला पाच ते सहा बँडेज लावण्यात आले आहे. एका फॅनन लिहिलं आहे की, तु लवकर बरी हो, आम्हाला तुझी फार काळजी वाटते आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, आम्ही आपली काळजी करत आहोत. तुम्ही मोठ्या धीराच्या आहात. काळजी घ्या. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यात रुबिना नेहमी अग्रेसर असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. बिग बॉसमधून तिच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली आहे.

रुबिनाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, तिनं बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. अभिनव शुक्ला आणि रुबिनाची जोडी बिग बॉसमध्ये यशस्वी झाली होती. काही दिवसांपूर्वी तिनं अभिनव सोबत एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रुबीना काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. यावेळी तिनं इंस्टावर पोस्ट शेयर करुन त्याबाबत चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी आवाहनही केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पुणे बेंगलोर महामार्गावर वाकड येथे गॅस टँकरला ट्रकने दिली मागून जोरदार धडक, टँकर मधून गॅस गळती

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

SCROLL FOR NEXT