Bigg Boss Tamil 7 Winner archana ravichandran lifts the trophy kamal haasan
Bigg Boss Tamil 7 Winner archana ravichandran lifts the trophy kamal haasan  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss Tamil 7 Winner: अर्चना रविचंद्रन ठरली कमल हासनच्या 'बिग बॉस 7 तामिळ'ची विजेती

Devendra Jadhav

Bigg Boss Tamil 7 Winner: कमल हासनने होस्ट केलेला वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस तामिळचा ७ वा सीझन टीव्ही अभिनेत्री अर्चना रविचंद्रन जिंकली आहे.

अर्चना बिग बॉस तामिळचा ७ वा सीझन जिंकली असून ती या घरातली वाइल्डकार्ड स्पर्धक होती. याशिवाय मणिचंद्र हा बिग बॉस तामिळ 7 चा उपविजेता ठरला.

1 ऑक्टोबर 2023 रोजी 18 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या शोमध्ये नंतर पाच वाइल्ड कार्ड एंट्री स्पर्धक आले. बिग बॉस तामिळ ७ च्या फायनलमध्ये माया, मणी, विष्णू, दिनेश, अर्चना हे टॉप 5 स्पर्धक होते.

या सर्वांवर वरचढ ठरच अर्चना विजयी झाली. तिला विजयी रक्कम म्हणून ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळाले. मणी हा उपविजेता तर माया या रिअॅलिटी शोची 2री रनर अप बनली.

बिग बॉस तामिळ 7 चा ग्रँड फिनाले शानदार पद्धतीने पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये माजी स्पर्धकांचे डान्स प्रमुख आकर्षण होते.

अंतिम फेरीत विष्णू विजय हा बिग बॉस तामिळच्या अंतिम फेरीतून बाहेर गेलेला पहिला स्पर्धक होता. पुढे एकएक करुन स्पर्धक बाहेर गेले. आणि अर्चना रविंचंद्रन बिग बॉस तामिळ 7 ची विजेती ठरली.

होस्ट कमल हासनने ग्रँड फिनालेमध्ये घरात एन्ट्री केली आणि अंतिम स्पर्धकांशी संवाद साधला. संभाषणादरम्यान त्याने व्यक्त केले की, खेळ सुरू होण्यापूर्वी हा फक्त एक शुटींग सेट होता, परंतु आता त्याचे घरामध्ये रूपांतर झाले आहे. तसेच कमल यांनी स्वतः प्रत्येक फायनलिस्टसाठी खास तयार केलेले पुस्तक भेट म्हणून दिले. त्यावर त्यांची स्वतःची स्वाक्षरी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT