biopic on big boss 14 fame actress rakhi Sawant script will be written by javed Akhtar
biopic on big boss 14 fame actress rakhi Sawant script will be written by javed Akhtar  
मनोरंजन

राखी सावंतच्या आयुष्यावर 'बायोपिक'; जावेद अख्तर लिहिणार 'स्क्रिप्ट' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  प्रसिध्द गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे. त्याचे कारणही अजब आहे. जावेद यांच्यासारख्या प्रख्यात पटकथाकारानं राखीच्या आयुष्यावर बायोपिक तयार करायचा आहे असे सांगून एक नवा वाद ओढावून घेतला आहे. राखी बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाली होती. यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धक म्हणून राखीचे नाव घेता येईल. अंतिम चार स्पर्धकांमध्ये तिचा सहभाग होता. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे ती चर्चेत आली होती. अनेकदा तिला बिग बॉसच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. 

आपल्या बेताल वक्तव्यांमुळेही राखी सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. काही दिवसांपूर्वी गीतकार जावेद अख्तर आपल्यावर बायोपिक बनवणार आहेत. असे राखीनं सांगितले होते. अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे जावेद अख्तर ट्रोल झाले होते. त्यांनीही त्यावर एक प्रतिक्रिया दिली होती. काही दिवसांपासून राखी सावंत बिग बॉसमधून लोकप्रिय झाली आहे. त्यावेळी तिनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण केला होता. राखीनं यावेळी 14 लाख रुपयांची रक्कम घेऊन बाहेप पडणे पसंद केले होते. त्यानंतर तिनं ते पैसे आपल्या आईच्या इलाजासाठी वापरणार असल्याचे सांगितले.

एका मुलाखतीत राखीनं सांगितले होते की, बॉलीवूडचे प्रसिध्द गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांच्यासोबत मी माझी पूर्ण कथा शेअर केली आहे. कोरोना येण्यापूर्वी त्यांची भेट घेऊन मी ही कथा त्यांना ऐकवली होती. त्यावेळी ते माझ्या आयुष्यावर बायोपिक करणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी मी त्यांची भेटही घेतली होती. ज्यावेळी जावेद अख्तर यांना याविषय़ी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, मी राखीची भेट घेतली होती. लवकरच तिच्या आयुष्यावर आधारित एक स्क्रिप्ट तयार करणार आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी राखी आपल्याला फ्लाईटमध्ये भेटली होती. तेव्हा तिनं आपल्या लहानपणाविषयीही सांगितले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT