anurag.jpg
anurag.jpg 
मनोरंजन

‘सेक्रेड गेम्स 2’मधील दृश्यामुळे अनुराग कश्यप नव्या वादात

वृत्तसंस्था

मुंबई : अनुराग कश्यप हा एक नावाजलेला दिग्दर्शक होय. त्याने आपल्या नावाचे वलय बॉलिवूडमध्ये तयार केले आहे. सध्या अनुराग त्याच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायम वादाच्या भोवर्यात असणारा अनुराग नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स 2’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान याने शिख तरूणाची भूमिका साकारली आहे. एका सीनमध्ये तो स्वत:च्या हातामधले कडे काढून समुद्रात फेकतो. बग्गा यांनी या सीनवर आक्षेप नोंदवला आहे. 

बग्गा यांच्या मते हातातील कडं ही शिख धर्मातील एक पवित्र व अविभाज्य वस्तू आहे. ती अपार आदर व श्रद्धेने परिधान केली जाते. ‘सेक्रेड गेम्स 2’च्या दिग्दर्शकाने या कड्याचा आणि पर्यायाने शिख समुदायाचा अपमान केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दिग्दर्शकाने शिख समुदायाच्या भावना भडकवण्यासाठी आणि समाजातील धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हा सीन टाकला, असेही बग्गा यांचा दावा आहे. या प्रकरणी त्यांनी अनुरागविरोधात कलम 295 ए, 153 ए,504,505 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT