Black Panther stuntman and children killed in car crash Esakal
मनोरंजन

Black Panther Stuntman Died: धक्कादायक! 'ब्लॅक पँथर' फेम स्टंटमॅनचा कार अपघातात तीन मुलांसह मृत्यू!

ब्लॅक पँथर आणि अ‍ॅव्हेंजर्सवरील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला स्टंटमॅन ताराजा रैमसेस याचा जॉर्जिया हायवेवर कार अपघातात मृत्यू झाला आहे.

Vaishali Patil

Black Panther stuntman and children killed in car crash: ब्लॅक पँथर आणि अ‍ॅव्हेंजर्सवरील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला स्टंटमॅन ताराजा रैमसेस याचा जॉर्जिया हायवेवर कार अपघातात मृत्यू झाला आहे.

फॉक्स-अटलांटाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली, जेव्हा रैमसेसची कार ट्रॅक्टर-ट्रेलरला धडकली. हेलोवीनच्या रात्री डेकाल्ब काउंटीमधील पिकअप ट्रकमध्ये आपल्या पाच मुलांसह प्रवास करत असताना हा अपघात झाला.

या अपघातात रैमसेसच्या दोन मुली एक 13 वर्षांची सुंदरी आणि आठ आठवड्यांची मुलगी फुजिबो यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. लाइफ सपोर्टवर असलेली रैमसेसची आई अकिलीने आपल्या मुलाच्या मृत्यूची पृष्टी केली आहे. या अपघातात रैमसेसच्या दोन मुली वाचल्या आहेत. त्यातच एकीला किरकोळ दुखापत झाली आहे.

स्टंटमॅन ताराजाच्या मृत्यूनंतर त्याची आई अकिलीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपले दुःख व्यक्त केले. आपल्या भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'जो कोणी त्याला ओळखतो आणि त्याला भेटला आहे त्यांना माहित आहे की ताराजा किती खास होता. त्याच्याकडे प्रेमाची क्षमता होती आणि सर्वात जास्त तो त्याचा मुलांवर प्रेम करायचा. त्याला त्याची मार्शल आर्ट्स, मोटरसायकल आणि चित्रपट सृष्टीशी संबंधित सर्व गोष्टी आवडत होत्या. त्याची विनोदबुद्धी खूप अनोखी होती.

ताराजा रामसेस Suicide Squad, Creed III, The Hunger Games: Catching Fire, Emancipation, and The Harder मध्ये काम केले होते. त्याने 'द हंगर गेम्स: कॅचिंग फायर', 'द वॉकिंग डेड' आणि 'द व्हॅम्पायर डायरीज' मध्येही काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT