मनोरंजन

Bloddy Daddy : पावसाळ्यात असे समीर नावाचे अधिकारी उगवतात! ब्लडी डॅडीमध्ये तो रोख कुणाकडे?

सिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ब्लडी डॅडी यांच्या या चित्रपटानं ओटीटीवरुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bloddy Daddy shahid kapoor movie sameer wankhede : प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ब्लडी डॅडी यांच्या या चित्रपटानं ओटीटीवरुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. ब्लडी डॅडीमध्ये शाहीदनं जी भूमिका केली आहे ती पाहून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

शाहिदच्या या चित्रपटामध्ये एक संवाद आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यात समीर नावाच्या पात्राचा उल्लेख आहे. समीर हा एक पोलीस अधिकारी आहे. काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. त्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर कारवाई केली होती. त्यानंतर ते खूपच लाईमलाईटमध्ये आले होते. सध्या त्यांच्यावरही चौकशी सुरु आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

शाहरुख खान आणि आर्यन खान यांचाही जबाव आता नोंदवून घेण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टाकडे आपल्याला अटकेपासून संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान ब्लडी डॅडी नावाच्या चित्रपटातून समीर नावाच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख हा अप्रत्यक्षपणे समीर वानखेडे यांच्याशी संबंधित तर नाही ना....अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा ब्लडी डॅडी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र तो थिएटमध्ये प्रदर्शित न होता ओटीटीवर प्रदर्शित होणार झाला आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरची फर्जी नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

आता शाहीदच्या नव्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र तसे होताना दिसत नाही. यावर फिल्ममेकर्स अब्बास अली यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहिदचा हा चित्रपट ओटीटीवर आला आहे.

ब्लड डॅडी ही फिल्म स्लिपलेस नाईट या फ्रेंच चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटावरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरुन होताना दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT