Blurr Teaser : Taapsee Pannu gives goosebumps as she is set to solve a murder mystery sakal
मनोरंजन

Blurr Teaser: थरकाप उडवणं काय असतं हे बघायच असेल तर तापसीच्या 'ब्लर'चा टीझर बघाच!

तापसी पन्नूचा 'ब्लर' (Blurr) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नीलेश अडसूळ

Taapsee Pannu Film Blurr Teaser : आपल्या दमदार अभिनयासोबतच वादग्रस्त विधानांमुळे बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमीच चर्चेत असते. हल्ली तिचे वागणेही बरेच बदलले आहे. ती अनेकदा पापराझींवर भडकत असते. तर काही पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करताना दिसते. त्यामुळे तापसीशी बोलताना सगळेच चार हात दुरून असतात. अशी तापसी आता एक भन्नाट चित्रपट घेऊन आली आहे. 'ब्लर' असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून मागे मोशन पोस्टर आले होते. आता 'ब्लर'च्या टीझर ने थरकाप उडवला आहे.

(Blurr Teaser : Taapsee Pannu gives goosebumps as she is set to solve a murder mystery)

तापसीचा (Taapsee Pannu) 'दोबारा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता मात्र तो बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी ठरला. आता तापसी पुन्हा नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तापसीच्या आगामी 'ब्लर' (Blurr) चित्रपटाचा टीझर आऊट झाला असून तो पाहून प्रेक्षकांची झोप उडाली आहे.

या टीझमध्ये तापसी कोणासोबत तरी फोनवर बोलताना दिसत आहे. ती म्हणत आहे.. तू गप्प का आहेस? उत्तर का देत नाहीस? मला माहित आहे की तू इथेच आहेस आणि तू मला पाहतो आहेस". त्यानंतर तापसीच्या ओरडण्याने टीझरचा शेवट होतो. यावेळी एखाद्या अंधाऱ्या बंद असलेल्या घरातून हा आवाज येत असल्याने काही गूढ घडणार असे संकेत हा टीझर देतो.

तापसी पन्नूने सोशल मीडियावर 'ब्लर'चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"सर्व बाजूंनी धोकाचं आहे. तरीही गायत्री या अडचणींचा सामना करू शकते का? तिच्या नजरेने जगाला पाहण्यासाठी तयार राहा".  'ब्लर' हा सिनेमा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. 

एका महिलेच्या संघर्षावर भाष्य करणारा 'ब्लर' हा सिनेमा आहे. या सिनेमात तापसी गायत्री नामक एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तापसीने या सिनेमाची निर्मितीदेखील केली आहे. हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत. तर अजय बहल आणि पवन सोनी यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT