Bobby Darling Delhi Metro Viral Passenger Metro Abuses 
मनोरंजन

Bobby Darling : दिल्लीच्या मेट्रोत 'बॉबी'चा राडा, प्रवाशाला मारहाण करुन केली शिवीगाळ! Video Viral

बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेल्या बॉबीनं आता दिल्लीच्या मेट्रोमध्ये दादागिरी केल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Bobby Darling Delhi Metro Viral Passenger Metro Abuses : बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेल्या बॉबीनं आता दिल्लीच्या मेट्रोमध्ये दादागिरी केल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनानं या घटनेची तातडीनं दखल घेतल्याचे दिसून आले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

बॉबीनं मेट्रोमध्ये एका प्रवाशाला मारहाण केली आहे. त्यात त्यानं त्या प्रवाशाला शिव्याही दिल्या आहेत. या प्रकरणचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन चर्चेचा विषय आहे. ते प्रकरण वाढत चालल्याचे लक्षात येताच सीआयएसएफच्या जवानानं हस्तक्षेप करत तो वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॉबीनं त्याचा आक्रमकपणा काही सोडला नाही.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये दिसलेल्या बॉबीनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यानं करण जोहरच्या चित्रपटांमध्ये काही भूमिका केल्या आहेत. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, बॉबी त्या व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण करत आहे. तो वाद एवढा वाढतो की त्यामध्ये सीआयएसफच्या जवानाला हस्तक्षेप करावा लागला होता.

व्हिडिओमध्ये दिसून येते की, बॉबीच्या हातात एक व्हाईट कलरची बॅग आहे. एक व्यक्ती ती बॅग ओढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी सीआयएसएफ जवान ती भांडणं सोडवताना दिसतो आहे. यासगळ्यात बॉबी त्या व्यक्तीला खूपच शिव्या आणि मारताना दिसून येते. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

DMRC ने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली भूमिका मांडली आहे. हिंदूस्थाननं दिलेल्या एका बातमीनंतर डीएमआरसीनं म्हटले आहे की, आम्ही अशाप्रकारचे बेशिस्त वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. याप्रकरणाची गंभीरपणे चौकशीही केली जाणार आहे. आम्ही प्रवाशांना विनंती करतो की, असे कोणतेही प्रकार दिल्यास त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT