Bobby Deol gets teary-eyed after Animal receive soaring success at box office video viral  SAKAL
मनोरंजन

Animal Bobby Deol: प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून लॉर्ड बॉबी भारावला! ढसाढसा रडायलाच लागला, व्हिडीओ व्हायरल

बॉबी देओल अ‍ॅनिमलला मिळालेलं प्रेम बघून भारावून गेलाय

Devendra Jadhav

अ‍ॅनिमल सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर धुराळा उडवत आहे. रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल सिनेमाने दोनच दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत बॉबी देओलने चांगलाच भाव खाल्लाय.

अ‍ॅनिमल मधील बॉबीच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. अशातच काल मुंबईत पापाराझींनी फोटोसाठी क्लिक केलं असताना बॉबी देओलच्या डोळ्यात पाणी आलं.

(Bobby Deol gets teary-eyed after Animal receive soaring success at box office video viral)

आणि बॉबीला रडू कोसळलं

काल मुंबईत बॉबी देओलने मिडीयाशी संवाद साधला. तेव्हा त्याने सर्वांसमोर हात जोडले. आणि म्हणाला, "सर्वांचे खुप खुप आभार! देव खुप दयाळू आहे. या सिनेमासाठी खुप प्रेम मिळालंय. असं वाटतंय की मी एक स्वप्न बघतोय."

असं म्हणत बॉबी त्याच्या गाडीकडे जायला निघाला. पण त्याला रडू कोसळलं. त्याने गाडीत बसल्यावर पुन्हा एकदा सर्वांने आभार मानुन डोळे पुसले.

अ‍ॅनिमलमध्ये बॉबी देओलने रंगवला खलनायक

'कबीर सिंग'च्या यशानंतर संदीप रेड्डी वंगा यांचा दुसरा बॉलीवूड प्रोजेक्ट अ‍ॅनिमल. सिनेमात रणबीर कपूर मुख्य भुमिकेत आहे. तर रणबीर कपूरला तगडी फाईट दिलीय ते म्हणजे बॉबी देओलने. बॉबी देओलने सिनेमात खुनशी खलनायक साकारलाय. अ‍ॅनिमल मधील बॉबी देओलच्या भूमिकेचं खुप कौतुक होतंय.

बॉबी देओलचा वर्क फ्रंट

बॉबी देओलच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं. क्लास ऑफ 83, लव्ह हॉस्टेल आणि आश्रम यांसारख्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे.

अ‍ॅनिमलमधील त्याच्या भूमिकेनंतर बॉबी आता आगामी औरंगजेब सिनेमामध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT