Bobby Deol Google
मनोरंजन

रशिया-युक्रेन युद्धाशी बॉबी देओलचं नाव का जोडलं जात आहे?

सोशल मीडियावर बॉबीनं यावर नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

प्रणाली मोरे

बॉबी देओलचं(Bobby Deol) सिनेमातलं करिअर हवंतसं बनू शकलं नाही याची खंत त्याने मागे एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. पण आता हळूहळू तो पुन्हा बॉलीवूड (Bollywood) मध्येआपलं हिरो म्हणून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडताना दिसतोय. आता त्याचं फिल्मी करिअर हळूहळू रुळावर येतंय खरं. पण अभिनेता म्हणून जरी सध्या तो प्रेक्षकांच्या गूड लिस्टमध्ये अद्याप सामिल झाला नसला तरी सोशल मीडियावर त्याच्या सक्रियतेमुळे तो भलताच प्रसिद्ध आहे. त्याचं असं आहे की,सोशल मीडियावर त्याचे मीम्स नेहमीच वायरल झालेले दिसून येतात. म्हणून तर त्याला सोशल मीडियावर 'लॉर्ड बॉबी देओल' म्हटलं जातं. नेटकरी नेहमीच बॉबीच्या सिनेमातील काही दृश्यांना एडिट करून त्याचे मजेदार मीम्स बनवून,त्याला एखादं भन्नाट कॅप्शन देत सोशल मीडियावर मीम्स शेअर करताना दिसतात.

नेटकऱ्यांच्या मजा-मस्करीत आता थेट बॉबीनंही उडी घेतली आहे. म्हणजे बॉबीनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं आपल्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या काही सिलेक्टिव्ह मीम्सला उत्तर दिलं आहे. बॉबीनं जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तो आपल्यावर केलेल्या मीम्सना उत्तर देताना दित आहे. तो व्हिडीओे शेअर करताना बॉबीनं लिहिलं आहे,''मित्रांनो,तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. अशाच मजेदार गोष्टी क्रिएट करत रहा''. त्या व्हिडीओमध्ये बॉबीनं आपल्या 'लव हॉस्टेल' सिनेमाला बघण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे. 'लव हॉस्टेल' सिनेमा 'झी5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात बॉबी सोबत विक्रांत मसी आणि सान्या मल्होत्रा अशी स्टारकास्टआहे. सिनेमात बॉबी खलनायक म्हणून भूमिका रंगवताना दिसेल. बॉबीच्या सिनेमातील भूमिकचे खूप कौतूक होताना दिसत आहे.

रशिया-युक्रेन(Russia-Ukraine War) च्या युद्धाला घेऊनही बॉबी देओलचं एक मीम वायरल झालं होतं. ज्या मीमध्ये बॉबीच्या एका सिनेमातील दृश्याचा वापर करण्यात आला होता. बॉबी त्यात रशियन सैन्याला चकमा देताना दिसला होता. म्हणजे त्या व्हिडीओत बॉबी युक्रेन देश असल्याचं दाखवलं गेलं होतं. सलमान खाननेदेखील बॉबीच्या 'लव हॉस्टेल' सिनेमातील कामाचं कौतूक करताना एक ट्वीट केलं आहे. ओटीटी वर बॉबीच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सिनेमातनं तो वेगळ्याच पद्धतीनं दिसत आहे. त्यानं आतापर्यंतच्या त्याच्या सिनेमातील स्वतःची इमेज ब्रेक केल्याचं त्यामुळे बोललं जात आहे. सोशल मीडियावर बॉबी सोबतच अक्षयचेही मीम्स अनेकदा वायरल होताना दिसतात. एकदा अक्षय कुमारनेही म्हणे आपला एक सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर त्याचा रिव्ह्यू केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलींना रात्री बाहेर पडू दिलं नाही पाहिजे, गँगरेप प्रकरणी ममता बॅनर्जींचं वादग्रस्त विधान

'तु माझ्या आयुष्यात...' प्राजक्ता माळीने मानले 'या' खास व्यक्तीचे आभार, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'यंदाचं वर्ष तुझ्यामुळे...'

Viral Video : हॉर्ट अटॅकने तडफडून कामगाराचा गेला जीव, मोबाईलवर व्यस्त मालकाने ढुंकूनही बघितले नाही; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

IND vs WI, 2nd Test: साई सुदर्शनने भारी कॅच तर पकडला, पण तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठीच नाही उतरला; BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Thane News: घोडबंदर मार्गावर वाहनांना नो एन्ट्री! ४ दिवस वाहतुकीत बदल; 'असे' असतील पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT