Bobby Deol says he would be grateful to Salman Khan for life know why  Esakal
मनोरंजन

Bobby Deol: मी आयुष्यभर सलमानचा ऋणी! अ‍ॅनिमलमधील डॅशिग कमबॅम करणारा बॉबी असं का म्हणाला?

Vaishali Patil

Bobby Deol  expressed his gratitude: रणबीरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अ‍ॅनिमल चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. रणबीर आणि रश्मिका मंदानाची जोडी असलेला या सिनेमाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

या चित्रपटाचा टीझर रिलिज होताच व्हायरल झाला मात्र या टिझरमध्ये शेवटी काही सेकंदासाठी आलेल्या बॉबी देओलनं या सिनेमात सगळा भाव खाल्ला. सगळीकडे चर्चा झाली ती फक्त या चित्रपटातील बॉबी देओलच्या रावडी लूकची.

गुप्त, अजनबी, हमराज, अपने आणि इतर सारख्या चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉबीने गेल्या काही वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यानंतर बॉबीचं करियर संपलं असं त्याच्या चाहत्यांना वाटलं होतं.

मात्र त्याने 2018 मध्ये सलमान खानच्या रेस 3 मध्ये दमदार भूमिका करत धडाकेबाज पुनरागमन केलं. या चित्रपटातील बॉबीच्या लूकने तो लाईमलाईटमध्ये आला. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आश्रम सारखी वेबसरिज करत त्याने ओटीटीवरही आपली जादू पसरवली.

मात्र बॉबी देओलने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या या दमदार सेकंड इनिंगचे श्रेय दिले ते बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला. इतकच नाही तर त्याने सलमानचे आभारही मानले.

नुकत्याच एका मुलाखतीत बॉबी देओलने सलमान खानबद्दल वक्तव्य केलं. यावेळी त्याने सलमानची कृतज्ञता व्यक्त करत सलमानचा रेस 3 हा चित्रपट त्याला कसा मिळाला याची स्टोरी त्याने सांगितली.

यावेळी बॉबी म्हणाला, "मी आयुष्यभर सलमानचे आभार मानत राहीन. सलमानने एक दिवस मला फोन केला आणि तो म्हणाला, 'मामू शर्ट काढणार(शर्टलेस होणार)का?' मी म्हणालो, 'मामू, मी काहीही करेन', त्यावर सलमान म्हणाला, 'उद्या माझ्या घरी ये', आणि अशाप्रकारे मला रेस 3 मिळाला."

बऱ्याच वर्षांचा ब्रेक घेतल्यामुळे आजची पिढी त्याला जास्त ओळखत नव्हती. त्यामुळे बॉबीला माहीत होत की सलमानच्या चित्रपटात त्याला चांगला प्रेक्षक वर्ग मिळेल. त्याने बॉबीचे नशिब बदलले. लोक मला ओळखू लागली आणि मला हाऊसफुल 4 सिनेमा मिळाला. त्यानंतर सर्वकाही सुरू झाल्याचे मला वाटले. अंस तो म्हणाला.

आता बॉबी त्याचा अ‍ॅनिमल चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. बॉबीसोबतच चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत. 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता बॉबीचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT