aamir and daughter ira khan 
मनोरंजन

आमिरच्या मुलीच्या नावाचा उच्चार चुकवला तर भरावा लागेल दंड 

सकाळ ऑनलाइन

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही जरी इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. आयराचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या नावाच्या उच्चाराबाबत सांगितलं आहे. "लोक नेहमीच माझ्या नावाचा चुकीचा उच्चार करतात. यामुळे माझे मित्र मला चुकीच्या नावाने चिडवतात. जर आता लोकांनी माझ्या नावाचा योग्य उच्चार केला नाही तर त्यांना पाच हजार रुपये दंड भरावा लागेल", असं ती या व्हिडीओत म्हणते. 

या व्हिडीओमध्ये आमिरची मुलगी म्हणते, "मीडियामध्ये आणि इतर अनेकजण माझं नाव इरा म्हणत असल्याने माझ्या मित्रमैत्रिणींनी मला प्रचंड त्रास दिला आहे. पण माझं नाव इरा नसून ते आयरा आहे. जो कुणी माझं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन." या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आयराने तिच्या नावाचं स्पेलिंग लिहिलं आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी तिचं नाव 'इरा' असंच आहे, असं वाटल्याचं सांगितलं. 

आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. आयरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती कशाप्रकारे नैराश्यात गेली आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल ती व्हिडीओद्वारे मोकळेपणाने सांगताना दिसते. आयरा सध्या फिटनेस प्रशिक्षक नुपूर शिखरेला डेट करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

SCROLL FOR NEXT