bollywood actor akshay kumar and leonardo dicaprio honoured for environmental preservation
bollywood actor akshay kumar and leonardo dicaprio honoured for environmental preservation 
मनोरंजन

लिओनार्दो डिकॅप्रियोसह बॉलीवूडच्या खिलाडीचाही गौरव; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - जगभरातील सेलिब्रेटी जसे आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द आहेत तसे ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक योगदानासाठीही प्रख्यात आहेत. अशात काही अभिनेत्यांमुळे जगातील दुर्गम भागांमध्ये अनेक समाजोपयोगी कामं होताना दिसत आहेत. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून वेगवेगळे कलाकार जागतिक पर्यावरणासाठी काम करताना दिसत आहेत. त्यात केवळ हॉलीवूडमधीलच कलावंत आहेत असे नाही तर बॉलीवूडच्या कलाकारांनीही त्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा गौरव होणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं जगभरात पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्तानं त्याला सन्मानित केले जाणार आहे.

हॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता लिओनार्दो दी कॅप्रिओ याच्यासोबत अक्षय कुमारला गौरविले जाणार आहे. सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये दीया मिर्झा, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अजय देवगण सारख्या कलाकारांचेही या यादीमध्ये नाव आहे. त्यात आता अक्षय कुमारचे नाव जोडले गेले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन ग्लोब ऑनर्स फाउंडेशन कलावंत अक्षय कुमार, हॉलीवूड सुपरस्टार लिओनार्दो डिकॅप्रियो यांच्यासह अन्य काही कलाकारांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. अक्षयनं गेल्या काही वर्षांपासून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे काम केले आहे. दुसरीकडे लिओनार्दोनं बराच काळापासून समुद्र त्यातील जैवविविधता वाचविण्यासाठी समाजात जनजागृती केली आहे.

अक्षय कुमारला याप्रकारे काही पहिल्यांदाच गौरविले जात नाहीये. त्यापूर्वी त्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कामांसाठी गौरव झाला आहे. सॅनेटरी पॅड आणि घराघरात शौचालय बनविण्यासाठी त्यानं एका चित्रपटाच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. त्याच्या त्या पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.

अक्षयच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचं झाल्यास त्याचा येत्या काही दिवसांत सूर्यवंशी आणि बेल बॉटम हे चित्रपट येत आहेत. कोरोनामुळे सुर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 
 
 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT