bollywood actor akshay kumar tests covid positive isolated himself
bollywood actor akshay kumar tests covid positive isolated himself 
मनोरंजन

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोना

युगंधर ताजणे

मुंबई -  बॉलीवूडमधील मातब्बर कलाकारांना कोरोनाची होणारी लागण चाहत्यांची भीती वाढवत आहे. एकापाठोपाठ अनेक कलाकारांना कोरोना झाला आहे. त्यांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता कहर कमालीचा धोकादायक ठरत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बॉलीवूड आर्थिक संकटात सापडले असताना दुसरीकडे आता कुठे समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यानं सर्वांच्या अ़डचणीत वाढ झाली आहे. आता बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारला कोरोना झाल्याची माहिती पुढे आली आहे.

अक्षयनं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे. देशात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात बॉलीवूडमध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. बॉलीवूडमध्ये खतरो के खिलाडी म्हणून प्रसिध्द असणा-या अक्षय़ला कोरोना झाल्यानं त्याच्या फॅन्सनं चिंता व्यक्त केली आहे. आता अक्षयनं स्वतला घरीच क्वॉरंनटाईन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अक्षय़नं कोरोनाची टेस्ट करुन घेतली होती. त्यात ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्याची डोकेदुखी वाढल्याचे पाहवयास मिळाले आहे. रविवारी सकाळी अक्षयनं सोशल मीड़ियावर ही माहिती पोस्ट केली. त्यानंतर त्यानं फॅन्सला आवाहन केलं आहे की त्यांनी कोरोना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन अक्षयनं केलं आहे.  काही दिवसांपासून बॉलीवूडमधील परिस्थिती गंभीर होते आहे. त्यात अनेक कलाकारांना कोरोना झाला आहे. काहींनी कोरोनाची व्हॅक्सिन घेतलं आहे. बरेचण आपआपल्या घरी क्वॉरंनटाईनही झाले आहेत. बॉलीवूडमध्ये तर अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांशी कलाकारांचे शुटिंग सुरु होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेक सहकलाकारांनी आपली कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांनाही कोरोना झाल्याचे दिसून आले आहे.

केवळ बॉलीवूडच नाही तर छोट्या पडद्यावरील कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता मालिका निर्मांत्यांमध्ये भीती पसरली आहे. कारण मागील वर्ष कोरोनामुळे त्रासदायक गेले आहे. त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावर झाला आहे. दिग्दर्शक, निर्माते यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. देशात कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. दिवसभरात पॉझिटिव्ह सापडणा-या पेशंटसची संख्या आता हजारोंच्या घरात आहे.   
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT