मनोरंजन

तरुण राहण्यासाठी अनिल कपूर पितो 'सापाचं रक्त'?

अजूनही आपल्या कामानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या कलाकारांची कमी काही बॉलीवूडमध्ये नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अजूनही आपल्या कामानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या कलाकारांची कमी काही बॉलीवूडमध्ये नाही. त्यात वानगीदाखल काही नावं सांगायची झाल्या, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा आणि अनिल कपूर यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून अनिल कपूर यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. 38 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वयाची 64 वर्षे पूर्ण करणाऱ्या अनिल कपूर यांना नेटकऱ्यांनी एका प्रतिक्रियेवरुन ट्रोल केले आहे. अखेर त्यांना त्यावर उत्तर द्यावं लागलं आहे.

अनिल कपूर यांना चाहते अजूनही त्यांच्या तारुण्याचे रहस्य विचारतात. त्याचं झालं असं की, ते अरबाज खानच्या पिंच नावाच्या शो मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या तारुण्याचे रहस्य चाहत्यांना सांगितले. मात्र त्यांच्या त्या प्रतिक्रियेवर काही जणांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. यावेळी अनिल कपूर यांनी सांगितलं होतं की, आपण पत्नीसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रोमँटिक पोस्ट शेयर करत असल्याचे सांगितले होते. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा अरबाजनं अनिल यांना त्यांच्या तारुण्याच्या रहस्याविषयी विचारले होते. अनिल कपूर म्हणाले, आपल्या देवानं आयुष्य दिलं आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या सगळ्यांजवळ 24 तास आहेत. मात्र आपल्याला स्वतासाठी एक तास द्यायचा आहे. त्यावेळी अनिल कपूर यांनी जे लोक आपल्याला तारुण्य टिकून राहावं म्हणून सापाचं विष घेतो तसेच प्लॅस्टिक सर्जन बरोबर असल्याचा आरोप करतात त्यांना सांगितलं आहे की, मी यापैकी काहीही करत नाही. रोजच्या रोज व्यायाम करणं, योग्य तो आहार घेणं, पुरेशी विश्रांती घेणं या गोष्टी मी पाळत आलो आहे. त्याचा मला फायदाही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेमुळे अनिल कपूर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिल, यार काय केलंस! यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकलं, कॅप्टनच्या चुकीचा फटका, फलंदाज चिडला...

Gold Price Today: सोन्याच्या भावात घसरण; सलग 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक, चांदीचे भाव मात्र वाढले

४ महिन्यात जाणवलं की आपला निर्णय चुकला... अखेर मयुरी वाघने सांगितलं घटस्फोटाचं कारण; म्हणते- ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने...

तालिबान सरकारच्या मंत्र्याची दिल्लीत पत्रकार परिषद, महिला पत्रकारांना बंदी; एस जयशंकर यांच्यासोबत बैठकीनंतरच्या घटनेनं संताप

Panchang 11 October 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्र पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT