The Kashmir files Movie News, Anupam Kher News Updates
The Kashmir files Movie News, Anupam Kher News Updates esakal
मनोरंजन

'देशाच्या GDP मध्ये पादचाऱ्यांचं योगदान नाही', काश्मीर फाईल्सचे अभिनेते बोलले

युगंधर ताजणे

Tv Entertainment: देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यावर आतापर्यत विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. (viral News) आता बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील महागाईवर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामध्ये काश्मीर फाईल्समध्ये (The Kashmir Files) महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली (Bollywood News) आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावरुन पुन्हा त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. अनुपम खेर यांची प्रतिक्रिया वेगळ्या कारणावरुन चर्चेत आली आहे. महागाई वाढल्यानं खेर यांनी त्याचा दोष रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना दिला आहे. त्यांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे खेर यांनी सांगितल्यानं नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. खेर यांच्यासारख्या अभिनेत्यानं अशाप्रकारचे वक्तव्य करणं हे नेटकऱ्यांना आवडलेलं नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे कित्येकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींच्या किंमतीत वाढ झाल्यानं जगावं की मरावं असा प्रश्न हा आता लोकांना पडू लागला आहे. अशावेळी त्यांची नाराजी ओढावून घेणारं वक्तव्य खेर यांनी केल्यानं त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. आपल्या हटकेपणासाठी आणि परखड मतासाठी अनुपम ओळखले जातात. ते सोशल मीडियावर देखील नेहमी अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे.

खेर यांनी एक पोस्ट शेयर करुन देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, सध्या आपली अर्थव्यवस्था जी ढासळली आहे त्यामागील एक मुख्य कारण म्हणजे देशात जी लोकं पायी चालतात ती आहेत. पादचारी लोकांमुळे सध्या जीडीपी कमी आहे. आणि जीडीपी त्यांचा कशाप्रकारे सहभाग नसल्याचे वक्तव्य खेर यांनी केलं आहे. त्यांनी इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. तो एक व्यंगात्मक व्हिडिओ असून ते म्हणतात, सायकलिंग हे देखील आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असणारी सुविधा आहे. त्याच्यापेक्षा जास्त भयाण म्हणजे जी लोकं पायी चालतात त्यांचे तर आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये कसलाच सहभाग नाही. कारण ते सायकल, गाडी, कशाचाही वापर करत नाही. त्यामुळे ते लोनही घेत नाहीत. अशी व्यंगात्मक प्रतिक्रिया खेर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT