bollywood actor anupam kher meet rajnath singh defence minister of india photos viral  SAKAL
मनोरंजन

Anupam Kher - Rajnath Singh: अनुपम खेर यांनी राजनाथ सिंह यांचे मानले आभार, हे आहे कारण

अनुपम खेर यांनी रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Anupam Kher - Rajnath Singh Meet: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी गुरुवारी, 28 डिसेंबरला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. अनुपम यांनी राजनाथ यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. अनुपम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर राजनाथ सिंह यांच्या भेटीचे अनेक फोटो शेअर केली आहेत.

अनुपम खेर यांनी मानले राजनाथ सिंह यांचे आभार

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये ते राजनाथ सिंह यांच्या शेजारी उभे राहून कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहेत.

दुसर्‍या फोटोत, अनुपण राजनाथ सिंह यांच्याशी बोलताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या संरक्षण दलांव्यतिरिक्त विविध विषयांचे त्यांचे अफाट आणि सखोल ज्ञान वाखाणण्यासारखे आहे. तुमच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले. तुमच्या प्रेमळ आणि आदरातिथ्याबद्दल धन्यवाद सर. जय हिंद."

अनुपम खेर यांचे आगामी सिनेमे

अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, ते नुकतेच 'द फ्रीलांसर - द कन्क्लुजन' मध्ये दिसले. याशिवाय लवकरच कंगना राणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी' या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहे,

हा चित्रपट यापुर्वी 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अनुपम खेर साकारणार रविंद्रनाथ टागोर

'इमर्जन्सी' व्यतिरिक्त, अनुपम खेर त्यांच्या 538 व्या चित्रपटात रवींद्रनाथ टागोरांची भूमिका देखील साकारणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना अनुपमने लिहिले होते, "माझ्या ५३८व्या प्रोजेक्टमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना आनंद झाला. गुरुदेवांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. या चित्रपटाविषयी अधिक माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT