bollywood actor anushka sharma adorable birthday wish for dad features daughter vamika see photo.jpg 
मनोरंजन

वामिकाचा आजोबांसोबत पहिला फोटो; अनुष्काने शेअर केली 'खास' पोस्ट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला 11 जानेवारीला कन्यारत्न झाले. त्यांनी मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटवर शुभेच्छांच्या वर्षाव झाला. वामिकाचा जन्म झाल्यावर विराट आणि अनुष्काने वामिकाला मिडीयापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिचा चेहरा दिसू न देता विराट आणि अनुष्का वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

अनुष्काने नुकताच एक खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. याफोटोमध्ये अनुष्काचे वडिल अजय कुमार शर्मा आणि वामिका दिसत आहेत. अनुष्काने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हा खास फोटो शेअर केला आहे. अजय यांचा 60वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त अनुष्काने तिच्या वडिलांचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. त्यामधील काही फोटो हे त्यांच्या तरूणपणातील आहेत. त्यातील एक फोटो वामिकासोबतचा आहे.

या फोटोमध्ये वामिकाच्या आजोबांनी तिला हातात धरले आहे. या दोघांचा  चेहरा या फोटोमध्ये दिसत नाही. पण त्यांच्यामधील प्रेमळ नाते या फोटोमधून दिसत आहे. या फोटोला अनुष्काने कॅप्शन दिले, 'मी कधीही परतफेड करू शकणार नाही अशा प्रकारे मला पाठिंबा दिला. आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. मी ही तुमच्या प्रेम करते बाबा तुम्हाला 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'

काही दिवसांपूर्वी विरूष्काने त्यांच्या घरावरील नेम प्लेटचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्यामध्ये वामिकाचे नाव विरूष्काने लिहीले आहे. नुकतीच वामिका दोन महिन्यांची झाली. यावेळी विरूष्काने घरच्या घरीच या खास दिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे. अनुष्काने सोशल मीडियावर वामिकाच्या बर्थडेच्या केकचा फोटो शेअर केला. हा फोटो वामिकाच्या वाढदिवसाच्या केकचा आहे. हा रेम्बॉकेकचा फोटो शेअर करून अनुष्काने, 'हॅप्पी 2 मन्थ टू ऑफ अस' असे लिहीले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT