bollywood actor arshad warsi stuggle after first flop movie wife income helps to survive sakal
मनोरंजन

Arshad Warsi Birthday: पहिलाच चित्रपट फ्लॉप अन् 3 वर्षे बायकोच्या पगारावर.. अर्शदला सतावतो 'तो' काळ..

पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अर्शदला करावा लागला होता संघर्ष..

नीलेश अडसूळ

Arshad Warsi Birthday: 'सर्किट' अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे अर्शद वारसी. अर्शदने बॉलीवूडच्या जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अर्शदचा अभिनय आणि त्यांची चित्रपटांची निवड याने कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तो विनोदी भूमिका जितक्या लीलया करतो तिच्याच गंभीर भूमिकांनाही न्याय देतो. आज जरी तो बॉलीवुड मधला एक महत्वाचा अभिनेता असला तरी त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अशा अर्शदचा आज वाढदिवस त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याची स्ट्रगल स्टोरी..

(bollywood actor arshad warsi stuggle after first flop movie wife income helps to survive)

अर्शद वारसी मूळचा मुंबईचाच. अर्शदने त्याच्या अभिनय करियरची सुरूवात १९९६ साली 'तेरे मेरे सपने' या त्याच्या पहिल्या चित्रपटाने केली होती.'तेरे मेरे सपने' या चित्रपटाला अभिनेता अमिताभ बच्चनच्या प्रोडक्शन हाउस एबीसीएलच्या बॅनर अंतर्गत बनवल्या गेले होते.परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमधे पाहिजे तशी धमाल केली नाही आणि त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला.

त्यामुळे नंतरच्या दिवसात त्याला काम मिळणे कठीण झाले.त्याचा चित्रपट क्षेत्रातील हा संघर्ष जवळपास तीन वर्ष चालला.या काळात त्याच्या हाती चित्रपट तर नव्हतेच पण इतर कुठले कामही त्याच्या हाती नव्हते.

अरशद वारसीची पत्नी मारिया गोरेटी हीने मात्र त्याची साथ दिली.त्याच्या कठीण काळात ती हिमतीने त्याच्या सोबत उभी राहिली.अरशदला चित्रपटात काम मिळावं यासाठी तो या क्षेत्रात तीन वर्ष वण वण फिरला.या काळात अर्शदची पत्नी मारियाच्या पगाराने घर चालायचे.याबद्दल स्वत: अर्शदने त्याच्या 'इरादा' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितले होते.

'संघर्ष' या चित्रपटानंतर मात्र अर्शदचे सोनेरी दिवस सुरू झालेत. २००३ मधे आलेल्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमधे धमाल केली.या चित्रपटातील त्याची 'सर्किटची' भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे. गोलमाल सीरीज, धमाल, जॉली एलएलबी, इश्किया अशा अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकाची मनं जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT