Dharmendra Fiat Video Viral esakal
मनोरंजन

Video: धर्मेंद्र यांची फियाट लई भारी!, 62 वर्ष झाली अजूनही एकच नंबर

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर गारुड केलेल्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांचे नाव पहिल्यांदा घ्यावे लागते.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood Actor Dharmendra: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर गारुड केलेल्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांचे नाव पहिल्यांदा घ्यावे लागते. ते सध्या 86 वर्षाचे आहे. मात्र अजुनही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. (Entertainment News) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या धर्मेंद्र यांच्या (Bollywood Actor) व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता त्यांनी आपल्या 62 वर्ष जुन्या फियाटचा व्हिडिओ शेय़र केला आहे. (Viral Video) 52 सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हे स्वता: फियाट ड्राईव्ह करत आहे. नेटकऱ्यांना धर्मेंद्र यांच्या त्या व्हिडिओनं आगळी वेगळी ट्रीट दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या फियाटचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेयर केला असून धर्मेंद्र स्वता गाडी चालवत आहे. सोशल मीडियावरील त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वयाच्या 86 व्या वर्षी धर्मेंद्र हे सफाईदारपणे ड्राईव्ह करत असल्याचे दिसून आले आहे. डोंगराळ भागामध्ये मोठ्या कौशल्यानं धर्मेंद्र यांनी ड्राईव्ह करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 1960 मध्ये ही फियाट कार खरेदी केली होती. या गाडीसोबतच्या अनेक आठवणी आहेत. माझी सर्वात आवडती, प्रेमाची ही फियाट आहे. आज मी पुन्हा एकदा तिला डोंगराळ भागातून फिरवलं आहे. अजूनही ती स्पेशलच आहे.

धर्मेंद्र यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ते लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन आणि शबाना आझमी हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करणार आहे. याशिवाय ते त्यांची निर्मिती असलेल्या अपने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहेत. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवही अपनेनं मोठी कमाई केली होती. त्यात सनी देओल, बॉबी देओल यांच्या भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT