Saira Banu says Dilip Kumars condition has improved 
मनोरंजन

अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात; सायरा बानो यांनी दिली माहिती

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याची माहिती सायरा बानो यांनी दिली आहे. दिलीप कुमार यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजते. सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणलं आहे. कोरोनामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी यावेळी त्यांच्या लग्नाचा 54 वा वाढदिवससुद्धा साजरा केला नव्हता.

दिलीप कुमार यांचे वय सध्या 98 वर्षे इतकं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करत आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेलं असं सायरा बानो यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना सांगितलं.

दिलीप कुमार यांनी ट्विटरवरून नुकतंच एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये कोरोनच्या संकटात सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, सर्व लोकांनी सुरक्षित राहा.

कोरोनाच्या संकटकाळात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले आहे. त्यामुळेच सायरा बानो यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं होतं. दिलीप कुमार यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली होती. दिलीप कुमार यांनी भावंच्या निधनाने झालेलं दु:ख व्यक्त केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You India! लिहित इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

जाऊ द्या ना काका... ! तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवले? Video Viral

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

SCROLL FOR NEXT