Krushna Abhishek and Govinda news  esakal
मनोरंजन

Govinda-Krushna Abhishek: मामा - भाच्याचं भांडण मिटलं! नात्यात गोडवा

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा आणि त्याचा लाडका भाचा प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा (Actor Krushna) यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actor Govinda: बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा आणि त्याचा लाडका भाचा प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा (Actor Krushna) यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्या भांडणाची सोशल मीडियावर देखील (Social Media Viral News) वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णानं आपण ज्या चित्रपटात मामा गोविंदा असेल त्यात काम करणार नाही. असे सांगितले होते. यासगळ्या प्रकरणावर कृष्णाची पत्नी कश्मिरा शहानं देखील प्रतिक्रिया दिली होती. तिनं सांगितलं होतं की, या दोघांच्या भांडणात मला काडीचाही रस नाही. दुसरीकडे कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद आता मिटला असून त्यांनी समजूतदारपणानं ते वाद मिटवल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

बराच काळ मामा - भाच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यात गोविंदा (entertainment news) सारख्या अभिनेत्यानं खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे, कृष्णानं देखील गोविंदाच्या स्टारडम, लोकप्रियतेचा विचार न करता जशास तसे उत्तर देणे यासाऱ्याची दखल चाहत्यांनी घेतली होती. घरातील वाद समजुतीनं मिटवून घ्यावा. असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यावर अखेर गोविंदानं कृष्णाला माफ केलं आहे. ही बातमी जेव्हा नेटकऱ्यांपर्य़त वाचली तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या दोघांना देखील धन्यवाद दिले आहे. गुण्यागोविंदानं नांदण्याचा सल्ला दिला आहे.

बॉलीवूडमध्ये मामा - भाचा अशी लोकप्रिय जोडी म्हणून ज्यांच्याकडे मोठया कौतूकानं पाहिले जाते त्या गोविंदा - कृष्णातील वाद हा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हा नेटकऱ्यांसाठी खास चर्चेचा विषय होता. त्यांच्यातील वाद हा मनीष पॉलच्या पॉडकास्ट कार्यक्रमातून सुरु झाला होता. तो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला होता. मनीषनं काही दिवसांपूर्वी कृष्णाला आपल्या शो मध्ये बोलावलं होतं. तेव्हा कृष्णानं जाहिरपणे गोविंदाची माफी मागितली होती. त्यावर आता गोविंदानं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं कृष्णाला माफ केले आहे.

मनीष पॉलनं आपल्या पॉडकास्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये गोविंदा म्हणतो की, मला माझ्या बहिणीकडून खूप प्रेम मिळालं. कृष्णावर देखील माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे मी त्याला आता माफ करतो आहे. त्यानं देखील माफी मागितली आहे. आमच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण झाला आहे त्यामुळे मी आनंदित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT