Hrithik Roshan Vikram Vedha New Look  esakal
मनोरंजन

Hrithik Roshan: विक्रम वेधाचा कडक लूक गर्लफ्रेंडची ढिंनच्यॅक कमेंट

बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनची (Hrithik Roshan) गोष्टच काही और आहे.

सकाळ ऑनलाइन टीम

Bollywood Actor: बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनची (Hrithik Roshan) गोष्टच काही और आहे. कहो ना प्यार है पासून बॉलीवूडमध्ये प्रवास सुरु करणाऱ्या या (Bollywood News) अभिनेत्याचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. सोशल मीडियावरही तो नेहमी अॅक्टिव्ह असतो. अभिनय, त्याची स्टाईल आणि डान्स (Entertainment News) यामुळे ह्रतिक हा नेहमीच चाहत्यांसाठी स्पेशल राहिला आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याच्या आगामी विक्रम वेधा नावाच्या (Vikram Vedha Movie) चित्रपटामुळे. या चित्रपटातील त्याचा लूक व्हायरल झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर ह्रतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनं जी कमेंट दिली आहे त्याचीही चर्चा आहे.

तमिळ चित्रपट विक्रम वेधा हा लोकप्रिय चित्रपट आहे. त्याचा हिंदी रिमेक येत्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होता. अखेरीस त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून त्यातील ह्रतिकच्या लूकला नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. हिंदीतील विक्रम वेळा चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री य़ांचे असून तमिळमधील चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. विक्रम वेधामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेही दिसणार आहे. ह्रतिकनं या चित्रपटामध्ये वेधाची भूमिका साकारली असून विक्रमच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे.

ह्रतिकनं त्याच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला असून त्यावर नव्या गर्लफ्रेंडन साबानं कमेंट तेली आहे. ह्रतिक त्या फोटोमध्ये ट्रेंडी ब्लॅक डेनिम टी शर्टच्या वेषात दिसतो आहे. त्याचा तो लूक चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. त्या फोटोला ह्रतिकनं कॅप्शन दिली आहे. त्यात तो म्हणतो, अखेर विक्रम वेधा मधील माझा लूक समोर आला आहे. तो आपल्या सर्वांसाठी शेयर करताना मला आनंद झाला आहे. सबा आझादनं कमेंट केली आहे. सबानं त्या फोटोवर हार्ट इमोजी शेयर केला असून त्या फोटोचं कौतुक केलं आहे. यापूर्वी ह्रतिकनं त्याच्या कित्येक चित्रपटांमध्ये हिरोच्या भूमिका केल्या आहेत. विक्रम वेधामध्ये मात्र तो नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्यानं त्याची उत्सुकता अधिक आहे. 2006 मध्ये आलेल्या धूम 2 मध्ये त्यानं ग्रे शेड भूमिका साकारली होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT