bollywood actor irrfan khan son babil slams media asking if he was high images.jpg 
मनोरंजन

पिऊन आलाय का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर इरफानच्या मुलाची खतरनाक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने नुकतच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण बाबिलने या पोस्टमधून पत्रकारांवर भाष्य केले आहे. नुकताच दिवंगत अभिनेता इरफान खान यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अंग्रेजी मिडीयम या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार इरफानला देण्यात आला. यावेळी बाबिलने इरफान यांचे कपडे परिधान केले होते. यावेळी वडिलांच्या आठवणीत बाबिल भावूक झाला.
  
फिल्मफेअर पुरस्कारावेळी घडलेल्या घटनेसंबंधीत एक पोस्ट बाबिलने सोशल मिडीयावर शेअर केली. पुरस्कार सोहळा जेव्हा पार पडत होता. तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी बाबिला असा काही प्रश्न विचारला की, बाबिलाची तळ पायाची आग मस्तकात गेली. त्यानं त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला. बाबिलंन इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. त्यामध्ये त्याने पुरस्कार सोहळ्यात घडलेला प्रकार नेटकऱ्यांसोबत शेअर केला. 

बाबिलने पोस्टमध्ये लिहीले की, 'मला तुम्हा सर्वांना एका प्रसंगाबद्दल सांगायचं आहे. मी नुकतीच फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यान तिथं असलेल्या सात पत्रकारांनी मला पिऊन आलाय का? असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे माझे डोळे. माझा लुक. भारीच हा मित्रांनो, खूपच चांगला शोध लावला तुम्ही. युनिव्हसिटी सोडली तेव्हापासून मी पूर्णपणे नॅचरल आहे. माझा हा नॅचरल लुक तुम्हाला नशेत असल्यासारखा वाटतोय, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! हाच माझा चेहरा आता मी बॉलिवूडमध्ये वापरून कोट्यवधी रुपये कमवणार आहे'. या पोस्टमुळे बाबिल चर्चेत आला आहे. त्याच्या डोळ्यामुळे आणि कपड्यांमुळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बाबिलने दिलेले उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी इरफानचे कपडे घालून आवरत असतानाचा आपल्या आईसोबतचा व्हिडीओ बाबिलने सोशल मिडीयावर पोस्ट केला.   

नुकताच बाबिलने खुलासा केला की, त्याला त्याच्या वडिलांसारख अभिनेता व्हायचं आहे. सध्या बाबिल त्याचा भाऊ अयानसोबत एका म्युझिक अल्बमवर काम करत आहे. पण यासोबत त्याला वडिलांची अभिनयाची परंपरासुद्धा पुढे न्यायची आहे. काही दिवसांपूर्वी बाबिलने इरफान यांच्या एका डायरीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये इरफानने बाबिलसाठी लिहिलेले काही अभिनयाचे टिप्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT